413709

आंतरपीक पद्धतीचे नियोजन

आंतरपीक पद्धतीचे नियोजन

ज्वारी + तूर –

1) ज्वारी + तूर ही आंतरपीक पद्धती 3ः3 किंवा 4ः2 अशा ओळींच्या प्रमाणात लागवड करावी.
2) ज्वारीचे पीक 110 ते 115 दिवसांत निघून गेल्यावर ज्वारीच्या पाटातील ओलावा, अन्नद्रव्ये तुरीला उपलब्ध होतात. मोकळी हवा, सूर्यप्रकाश उपलब्ध होतो. मोकळी हवा, सूर्यप्रकाश यामुळे तुरीच्या सलग पिकापेक्षाही आंतरपीक पद्धतीतील तुरीचे पीक अधिक जोमदार येऊन उत्पादन चांगले मिळते.
3) तूर व ज्वारी यांच्यावर येणाऱ्या कीड व रोगांच्या प्रादुर्भावाचे प्रमाण कमी होते.
4) ज्वारी + तूर ही एक स्वयंचलित फेरपालट होणारी आंतरपीक पद्धती आहे. एकाच शेताच्या तुकड्यावर गरज पडल्यास 2 ते 3 वर्षे ही पीक पद्धती घेता येते. असे करताना दुसऱ्या वर्षी ज्वारीच्या ओळींच्या क्षेत्रावर तुरीच्या ओळी पेरल्या जातील, याची काळजी घेणे जरुरीचे आहे.

बाजरी + तूर (3-3)

  • कमी पावसाचा भाग, मध्यम जमिनीची तथा उशिरा पेरणीसाठी या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.

कापूस + सोयाबीन (1-1)

  • भारी जमिनीमध्ये आणि ज्या ठिकाणी थोडा सखोल भाग आहे अशा भागात कापूस + सोयाबीन ही आंतर पीक पद्धती उपयुक्त आहे.
  • सोयाबीनच्या लवकर पक्व होणाऱ्या जातीची (एम.ए.यू.एस. 71) निवड करावी. उशिराने तयार होणाऱ्या जातींची निवड आंतरपिकासाठी करू नये.
  • सोयाबीन जलद वाढणारे आणि जास्त खतमात्रा लागणारे पीक आहे, त्यामुळे खताच्या नियोजनात शिफारसीत केलेली 80 टक्के खताची मात्रा कापसाचा ओळीत द्यावी. यामुळे सोयाबीन पिकाच्या जलद वाढीचा कापसाच्या वाढीवर विपरीत परिणाम न होता, कापसाची वाढही चांगल्या प्रकारे होते.

 

कापूस +तूर (6-1 किंवा 8-1)

  • ही एक पारंपरिक पट्टापद्धती असून, वेगवेगळ्या भागांत कापसाच्या विशिष्ट ओळीनंतर तुरीच्या एक किंवा दोन ओळी पेरतात.

सोयाबीन + तूर (4-2)

  • मुख्य पीक आणि आंतरपीक दोन्ही कडधान्यवर्गीय असून, हमखास उत्पन्न देणारी आंतरपीक पद्धती आहे.
  • मध्यम जमिनीत हमखास पावसाच्या प्रदेशात तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य आंतरपीक पद्धती.

मका + सोयाबीन (2-2)

  • मक्‍याची पट्टापद्धतीने (75 – 45 सें.मी.) लागवड करताना दोन पट्ट्यांतील अंतरामध्ये (75 सें.मी.) सोयाबीनच्या दोन ओळी पेराव्यात.

43 total views, 0 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *