413709

ऊसातील आंतरपिके

ऊसातील आंतरपिके

सुरू उसातील आंतरपिके

पिके पिकांच्या जाती कालावधी
भुईमुग जे एल -२४ , एसबी -११,जेल -५०१,टीएजी -२४ ९० ते ९५

१०५ ते ११०

१०० ते १०५

कांदा बसवंत ७८०

फुले समर्थ

१०० ते ११०

८५ ते ९०

कोबी गोल्डन एकर ६५ ते ८०
फुलकोबी स्नो बॉल -१६ , पुसा सिंथेटिक ० ते १००
मेथी पुसा अर्ली बंचीग ,कसुरी ३० ते ४०
कलिंगड शुगर बेबी ,अर्का  माणिक ९० ते १२०
काकडी हिमांगी , फुले,शुभांगी ९० दिवस

सुरु उसामध्ये आंतरपिकाची निवड केल्यानंतर त्या आंतरपिकाच्या जमिनक्षेत्राच्या प्रमाणानुसार आंतरपिकाच्या बियाण्याचे प्रमाण ठरविणे गरजेचे आहे.

सुरु उसामध्ये आंतरपिकाचा समावेश केल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव फारसा दिसत नाही. परंतु आवश्यकतेनुसार खुरपणी करवी. कृषि विद्यापीठाच्या शिफारशीनुसार निवडक रासायनिक तणनाशकांचा वापर करावा.

सुरू ऊस आणि आंतरपिकासाठी खत व्यवस्थापन

(खत व्यवस्थापन (कि./हे.) को. ८६o२२ व्यतिरिक्त इतर सर्व ऊस जातींसाठी)

खतांचा हप्ता देण्याची वेळ नत्र (कि./हे.) स्फुरद (कि./हे.)           पालाश (कि./हे.)
लागवडीच्या वेळी २५ ६०                          ६०
लागवडीनंतर ६ ते ८ आठवड्यानी १००
लागवडीनंतर १२ ते १६ आठवड्यानी २५
बांधणीच्या वेळी १०० ५५                             ५५
एकूण २५० ११५                           ११५

को. ८६o३२ या जातीची उत्पादनक्षमता जास्त असल्यामुळे तसेच ही जात रासायनिक खतांच्या जादा खत मात्रेस प्रतिसाद देत असल्यामुळे या जातीसाठी (सुरू उसास) प्रती हेक्टरी ३०० किलो नत्र, १४० किलो स्फुरद व १४० किलो पालाश नेहमीच्या पद्धतीने वापरावे. जीवाणू खताच्या बेणे प्रक्रियेमुळे ५० टक्के नत्र व २५ टक्के स्फुरद अन्नद्रव्यांची बचत होते. म्हणून वरील शिफारशीत नत्र व स्फुरद खताची मात्रा हेक्टरी अनुक्रमे ५0 व २५ टक्के कमी करावी.

सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असणा-या जमिनीसाठी गरजेनुसार एकरी १o केिली फेरस सल्फेट व ८ किलो झिंक सल्फेट ५o ते १oo किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून द्यावे. स्फुरदयुक्त खताची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेट या खतामधून द्यावी. त्यामुळे गंधक या दुय्यम अन्नद्रव्याची अतिरिक्त मात्रा द्यावी लागणार नाही. सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केला नसल्यास एकरी २५ किलो गंधकाची मात्रा द्यावी. उसामध्ये आांतरपिकाची लागवड केली असता अांतरपिकास त्याच्या व्यापलेल्या क्षेत्राच्या प्रमाणानुसार शिफारशीत खतमात्रा द्यावी. आंतरपिके साधारण १00 ते ११o दिवसानंतर काढणीस येतात.

आंतरपिकाची काढणी केल्यानंतर खतमात्रा देऊन उसाची बांधणी करावी

 1. कांदा – (१oo:५o:५o) नत्र : स्फुरद: पालाश किलो/हेक्टरी
 2. भुईमूण – (२५:५0:00) नत्र : स्फुरद : पालाश किलो/हेक्टरी
 3. कोबी – (१६o:८o:८o) नत्र : स्फुरद: पालाश किलो/हेक्टरी
 4. फुलकोबी – (१५o :७५ :७५) नत्र : स्फुरद : पालाश कि./हेक्टरी
 5. कलिंगड/ काकडी – (१oo : ५o : ५o) नत्र : स्फुरद : पालाश किलो/हेक्टरी

उसातील कांदा, कोबी, फुलकोबी, कलिंगड व काकडी पिकास आंतरपिकाची खतमात्रा देताना १oo टक्के स्फुरद व पालाश आणि ५0 टक्के नत्र लागणीच्या वेळी देऊन उरलेले ५o टक्के नत्र लागवडीनंतर एक महिन्याने द्यावे. भुईमूग या पिकाला संपूर्ण खतमात्रा पेरणीच्या वेळी द्यावी. ऊस पिकामध्ये आंतरपिकाची योग्य निवड करून खत व पाणी व्यवस्थापन केल्यास उत्पादनात निश्चितपणे वाढ होते.

ट्रॅक्टरद्वारे उसात बटाटा आंतरपीक लागवड

 1. ऊस लागवडीसाठी शेतीची चांगली पूर्वमशागत करून घ्यावी. शक्य असल्यास खरिपात हिरवळीचे खत म्हणून ताग किंवा धंचा घ्यावा व हिरवळीचे पीक फुलो-यात येत असताना जमिनीत ट्रॅक्टरच्या नांगरांनी गाडावा किंवा शिफारशीप्रमाणे प्रती हेक्टरी १o टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीवर पसरून वखरणी करून घ्यावी.
 2. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या दुस-या आठवड्यापर्यंत लावल्या जाणा-या उसातच बटाट्याची लागवड करावी. उशिरा लागवड केल्यास बटाटा उत्पादनात घट येते.
 3. उसाच्या लागवडीसाठी सन्या, वरंबे करण्याआधी वरंब्यात भरपूर मातीत बटाटे येतील असे ट्रॅक्टर रिजरने वरंबे करावे.
 4. बटाट्याला द्यावयाचे रासायनिक खत ६० किलो नत्र, ६o किलो स्फुरद, १२० किलो पालाश प्रती हेक्टरी पाभरीने किंवा ट्रॅक्टर मोगड्याने बटाटा लागवडीपूर्वी पेरून द्यावा. (साधारणत: आठ बॅग १५:१५:१५ सुफला + दोन बँग म्युरेट ऑफ पोटॅश) तसेच एक महिन्याने राहिलेल्या नत्राची ६० कि./हे. (साधारणत: तीन बॅग युरिया) मात्रा बटाटा पिकास द्यावी व लगेच पाणी द्यावे.
 5. रासायनिक खत देताना सरळरेषेत जमिनीची उलथापालथ होऊन जमिनीवर ३ फूट अंतराच्या (९० सें.मी.) रेषा पडल्यासारख्या दिसतात. या रेषावर २५ ते ३० ग्रॅम आकाराचे कोंब फुटलेले बटाटे बियाणे साधारणत: एक वीत अंतरावर (१५ ते २० सें.मी.) ठेवत जावेत. बटाटा ओळीवर थिमेट १० किलो प्रती हेक्टरी लागवडीपूर्वी द्यावे. बटाटे मोठे असल्यास प्रत्येक फोडीवर २ ते ३ डोळे राहतील अशा बेताने तुकडे करून लावणी करावी. बटाटे लागवड करण्यापूर्वी बाविस्टीन (२५ ग्रॅम १o लि. पाणी) या बुरशीनाशक द्रावणात १५ ते २० मिनिटे बुडवून मग बटाटे लावावेत. प्रती हेक्टरी १५ ते २o किंवटल बटाटा बियाणे लागते.
 6. बटाट्यांच्या दोन ओळींच्या मध्यभागी ६0 ते ७o सें.मी. चा ट्रॅक्टर रिजर व्यवस्थित चालवावा. उसासाठी स-या होताना बटाटे आपोआप वरंब्यात झाकले जातात.
 7. पाणी देण्यासाठी रानबांधणी करावी. रानबांधणी करताना निघालेले बटाटे वेचून घ्यावेत.
 8. उसाला द्यावयाचा रासायनिक खताचा हसा सरीत टाकावा. दोन डोळ्याचे उसाचे तुकडे केलेले बेणे वरंब्यावर नीट ठेवून उसाच्या सरीला पाणी सुरू करावे. रानबांधणी व्यवस्थित करून सरीत उसाची लागवड करावी.
 9. आंबवणीचे पाणी म्हणजे ऊस लावल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी वरंबा दोन तृतीयांश भिजेल या बेताने पाणी द्यावे. लागवड केलेल्या वरंब्यातील बटाट्यास पाणी (ओल) पोहचेल अशा बेताने पाणी वाफ्यात पाणी साचून राहणार नाही याची खबरदारी घ्यावी. वरंब्यातील ओल पाहून पाणी द्यावे.
 10. ऊस + बटाटा आंतरपिकातील तणनियंत्रणासाठी लागवडीनंतर ५ ते ६ दिवसांनी जमिनीवर तणनाशकांची फवारणी करावी उदा. मेट्रोब्युझिन २५ ग्रॅम १o ली. पाण्यातून फवारावे किंवा ऑक्सफ्ल्युओरफेन १० मि.ली. १० ली. पाण्यात टाकून ऊस + बटाटा लागवडीनंतर ५ ते ६ दिवसांनी जमीन वापशावर असताना फवारावे.
 11. जमिनीच्या मगदुरानुसार (हलकी किंवा भारी) ८ ते १० दिवसाच्या अंतराने नंतर व्यवस्थित पाणी देत राहावे.
 12. कोंब फुटलेले बटाटे लावले असल्यास १० ते १५ दिवसांत उगवण होते व लावणीनंतर ३० ते ३५ दिवसांत बटाटा पिकाने वरंबे संपूर्ण झाकून जातात. वरंब्यातील बटाटा पिकास ३० ते ३५ दिवसांनी लहान बटाटे लागण्यास सुरुवात होते. त्यामुळे आंतरमशागत उदा. निंदणी आटोपून घ्यावी.
 13. बटाट्याचे पीक ९o ते १oo दिवसात तयार होते.
 14. लागवडीपासून १२ ते १६ आठवड्याच्या दरम्यान उसाला बांधणी करावी लागते. त्यासाठी वरंबे बैलाच्या तीन दाती मोगड्याने फोडून माती ढिली करावी व निघालेले बटाटे वेचून घ्यावेत. नंतर बैल किंवा पॉवर टिलर रिजरने उसाला माती चढवतात, तेव्हा पुन्हा जमिनीतील बटाटा काढणी होते, ते वेचून घ्यावेत.
 15. उसाच्या बांधणीचे वरील काम करताना बटाटे आपोआप जमिनीबाहेर पडतात ते वेचून घ्यावेत.
 16. उत्पादित झालेले लहान, मध्यम व मोठे बटाटे वेचून प्रतवारीनुसार पोती भरुन विक्रीस पाठवावे.

118 total views, 0 views today