413709

ऊस कीड व रोग नियंत्रण

ऊस कीड व रोग नियंत्रण 

ऊसाच मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या प्रामुख्याने किडी म्हणजे खोडकिड, हुमणी, लोकरी मावा, पायरीली, खवलेकीड, कांडीकीड, पांढरीमाशी आणि उंदीर.  अशा १४ प्रकारच्या किडी आणि उंदरासारखा प्राणी उसाच नुकसान करतात.

 • सर्वांत मोठं नुकसान खोडकिडीमुळे होत.  २५ ते ३०% उत्पादन घटत आणि १ ते १.५ टक्का साखरउतारा घटतो.  खोडकिडीमुळे मातृकोंब नष्ट होतात.  त्यामुळे फुटवे कमी आणि कमजोर निघतात.  खोडकिडीची अंडी  अळी – कोष आणि पतंग अशा चार अवस्था असतात.  फेब्रुवारीनंतर लावलेल्या उसात खोडकिडीचा प्रादुर्भाव जास्त आढळतो.  हि कीड पुढे कांड्यात जाते.  तिथंही नुकसान करते.  म्हणून हिच्या नियंत्रणासाठी-
 • उसाचं पहिलं पण काढून टाकाव.
 • खोल सरीमध्ये उसाची लागण करावी.
 • फेब्रुवारीनंतर लागण करू नये.  पाचटाचे आच्छादन करावे.
 • बाळबांधणी चांगली करावी.  कामगंध सापळे वापरावेत.
 • ट्रायकोग्रमा हे मित्रकीटक सोडावेत.  मॅलोथियॉनची बीजप्रक्रिया करावी.  दाणेदार लिण्डेन अगर सेव्हीडॉल १० किलो जमिनीतून द्यावे.
 • दुसरी नुकसानकारक कीड म्हणजे हुमणी. अंडी – अळी – कोष आणि भुगेरे या सगळ्या अस्वस्था नुकसान करतात म्हणून एक उपाय न योजता एकात्मिक नियंत्रण पद्धतीचा वापर करावा लागतो.  नांगरट, ढेकळ फोडण, पिकाची फेरपालट, सापळा पिकांचा वापर, अळ्या वेचून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकणे, भुंगेरे गोळा करून मारणे, शेत स्वच्छ ठेवावं.  प्रादुर्भावग्रस्त उसाचा खोडवा घेऊ नये.  बाभळी – कडूनिंबाच्या झाडावर कार्बारीलची फवारणी करावी.  १०% दाणेदार फोरेट लागणीच्या वेळेत ४ किलो मातीत मिसळाव.  मॅलेथियॉनची भुकटी खातात मिसळून घालावी.  मोठ्या उसात क्लोरोपायरीफॉस सरीतून द्यावे.  अशा प्रकारचे सगळे उपाय करून हुमनीचं नियंत्रण करावे.
 • उसावर येणाऱ्या पांढऱ्या लोकरीत माव्यामूळं उसाच्या उत्पादनात ७ ते १० आणि साखर उताऱ्यात ३.५% म्हणजे कमालीची घट येते!  गेल्या ५ – ६ वर्षापूर्वी उसाचं अति मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  पण अलीकडं मित्र कीटकांची संख्या वाढल्याने लोकरी मावा नियंत्रणात आला आहे.  लोकरी माव्याच्या बाल्यावस्था आणि प्रौढ अवस्था फार नुकसानकारक आहेत.
 • लोकरी माव्याच बरसच नियंत्रण मित्र कीटकांमुळे झालेलं आहे!  कोनोबाथ्रा हा मित्र कीटक रात्री मावा खातो.  महिनाभराच्या आयुष्यात ४००० पेक्षा जास्त मावा खातो.  एकरात ४०० कोनोबाथ्रा सोडाव्यात.  मगरी अळी एका दिवसात ४० – ५० मावा खाते.  सिरफीड – माशी एका दिवसात १५० पेक्षा जास्त मावा खाते.  सिरफीड माशीच्या एकरी ४०० अळ्या तोडाव्यात.  क्रायसोपर्ला कारनी हा मित्र कीटक प्रचंड भूक असणारा असल्याने दिवसात ३०० पेक्षा जास्त मावा खातो!  हा जास्त तापमानातही वाढतो.
 1. मित्र किटकाची अंडी – अळ्या उसाच्या पानाच्या मागच्या बाजूस टाचणीने टोचून लावावेत.  प्रादुर्भावग्रस्त भागात सोडल्यास त्यांचा प्रसार झपाट्याने होतो!  ते चांगले स्थिरावतात.
 2. याशिवाय रासायनिक खताचा संतुलित वापर करावा.  नत्र कमी द्यावे.
 3. दोन ग्रॅम असिफेट + १ लिटर पाणी यांची फवारणी करावी.  अगर
 4. ४% मॅलोथियॉनची धुरळणी करावी.
 5. त्याच बरोबर एकरी १० किलो दाणेदार फोरेट टाकावे.  म्हणजे लोकरी माव्याच नियंत्रण होईल.

* पायरीला किंवा तुडतुडे उसाच्या पानातल रस शोषतात.  मॅलोथियॉन, अॅसिफेट अगर
क्कीनालफॉसच्या फवारण्या कराव्यात.  खवलेकिडींचही या फवारणीमुळे नियंत्रण होईल.

ऊस पोक्का बोंग रोग 

रोगाची लक्षणे

पावसाळा हंगाम सुरू झाल्यानंतर किंवा पावसाळा हंगामापूर्वी पडलेल्या वळीव पावसामुळे हवेत आर्द्रता वाढते. त्या वेळी पोक्का बोंग या रोगास कारणीभूत असणाऱ्या फुजॅरियम मोनिलीफॉरमी या हवेद्वारे पसरणाऱ्या बुरशीची लागण उसाच्या शेंड्याकडील कोवळ्या पानांवर दिसून येते. सुरवातीस पोंग्यातील तिसऱ्या व चौथ्या पानांच्या बेचक्‍यात (पानाच्या व देठाच्या जोडाच्या ठिकाणी) पांढरट – पिवळसर पट्टे दिसून येतात. रोगाची लागण झालेल्या पानांवर सुरकुत्या पडून पाने आकसतात; तसेच त्यांची लांबी घटते. रोगाची तीव्रता वाढल्यानंतर उसाची पाने सडतात, कुजतात. यानंतर पाने गळून पडतात किंवा एकमेकांत गुरफटतात. पाने गुरफटल्याने कांड्यांचे पोषण होत नसल्याने कांड्या आखूड व वेड्यावाकड्या होतात. कधी रोगाची तीव्रता वाढल्यावर पोंगा मर किंवा शेंडाकूज दिसून येते. काही वेळेस रोगग्रस्त उसाच्या कांड्यांवर कांडी काप (नाइट कट) रोगाची लक्षणे दिसून येतात. शेंडाकूज व कांडी काप (नाइट कट) झालेल्या उसातील शेंडा जोम नष्ट झाल्याने उसावरील डोळ्यातून पांगशा फुटतात, कालांतराने असे ऊस वाळतात. रोगट उसाच्या कांड्या आखूड झाल्याने व पांगशा फुटलेल्या उसाच्या उत्पादनात घट येते. रोगामुळे उसाच्या बेटातील रोगग्रस्त उसाचेच नुकसान होते. रोगाने बाधित न झालेल्या उसाचे नुकसान होत नाही.

उसामधील पोक्का बोंग रोगाचे नियंत्रण 

पो क्का बोंग हा बुरशीजन्य रोग असून, फुजॅरियम मोनिलीफॉरमी या हवेद्वारे पसरणाऱ्या बुरशीमुळे होतो. कोसी- 671, को- 86032, कोएम- 0265, को- 8014, को- 94012, कोव्हीएसआय- 9805, व्हीएसआय- 434, को- 7527, को- 7219 आणि को- 419 या ऊस जाती या रोगास कमी-अधिक प्रमाणात बळी पडतात. उन्हाळा हंगाम संपतेवेळी पडणाऱ्या वळीव पावसानंतर या रोगाची लागण ऊस पिकामध्ये दिसून येते. पावसाळी हंगामात पडणाऱ्या सततच्या पावसामुळे आणि शेतात पाणी साचल्याने पिकांमध्ये सापेक्ष आर्द्रता वाढते, तापमान कमी होते. अशा परिस्थितीत या रोगाची बुरशी कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर वाढून रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. राज्यातील सर्व कृषी हवामान विभागांत या रोगाचा प्रादुर्भाव कमी – अधिक प्रमाणात आढळतो. दक्षिण महाराष्ट्रात मात्र पावसाळा हंगामात सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण हवेत जास्त काळ राहिल्याने या रोगाचे प्रमाण जास्त दिसून येते.

उसावरील  इतर रोग नियंत्रण

ऊस पिकावर बुरशी, सूक्ष्मजंतू, अतिसूक्ष्म विषाणू, सूत्र कृमी, अन्नद्रव्याची कमतरता, परोपजीवी वनस्पती यामुळे रोग होतात.  आपल्याकडे जवळजवळ ३० रोगांची नोंद झालेली आहे.  उसावर बेण्याद्वारे काणी, गवताळ वाढ, खोड-कुजव्या, पांगशा फुटण, मोझॅक, वाढ खुंटण, ऊस रंगने इत्यादी रोग येतात.  तर हवेद्वारे पसरणारे रोग म्हणजे पोक्का बोंग,  तांबेरा,  पानावरचे ठिबके आणि जमिनिद्वारे पसरणारे रोग म्हणजे अननस ( पाईनॅपल ) कांडी – कुज, मुळकुज  आणि मर.

 • उसावरची काणी – चाबूक काजळी हा रोग सर्वांना परिचित आहे.  अशी चाबूक काणी प्लास्टिकच्या पोत्यात काढून घेवून ते सर्व बेत मुळासह उपटून जाळून टाकाव,  बेण्यास उष्णजल प्रक्रिया करावी.  तसंच १०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम + १०० लिटर पाण्यात कांडीप्रक्रिया करावी.  रोगप्रतिकारक ६७१, ८६०३२, ९४०१२ या जाती लावाव्यात.
 • गवताळ वाढ हाही रोग परिचित आहे.  ऊस बेत मुळासकट उपटून जाळून टाकाव.  रोगमुक्त बेण लावाव.  उष्णजल प्रक्रिया करावी.  रसशोषणाऱ्या किडींचा बंदोबस्त करावा.
 • ऊसावरचा तांबेरा हा बुरशीजन्य रोग आहे.  संपूर्ण पान ताम्बेरायुक्त होते.  ८६०३२ सारखी प्रतिकारक जात लावावी.  रोगग्रस्त वाळलेली पान काढून जाळून टाकावीत.
 • उसाला लहानपणी पाण्याचा तान पडू देऊ नये.
 • पाण्याची दलदल होऊ देऊ नये.  तांबेऱ्याच्या नियंत्रणासाठी डायथेन एम. ४५, ३ ग्रॅम + १
 • लिटर पाणी याचं मिश्रण १० दिवसांच्या अंतराने २ -३ वेळा फवाराव.
 • उसवाराचा पोक्का बोंग हवेतल्या बुरशीमुळे होतो.  आर्द्रता आणि कमी तापमानात याचा प्रादुर्भाव वाढतो.  पान कुजल्याने, गुरफटल्याने कांड्यांचे पोषण न होता वेड्यावाकड्या आणि आखूड होतात.
 • शेंदेकुज + पांगशा फुटलेले ऊस काढून टाकावेत. २ लिटर पाणी याचं मिश्रण १० दिवसांच्या अंतराने २ -३ वेळा फवाराव.
 • उसवाराचा पोक्का बोंग हवेतल्या बुरशीमुळे होतो.  आर्द्रता आणि कमी तापमानात याचा प्रादुर्भाव वाढतो.  पण कुजल्याने, गुरफटल्यामुळे कांड्यांचे पोषण न होता वेड्यावाकड्या आणि आखूड होतात.
 • शेंडेकुज + पांगशा फुटलेले ऊस काढून टाकावेत.  २ ग्रॅम कॉपर  ऑक्झिक्लोराईड + लिटर पपांनी यांचे मिश्रण १० दिवसांच्या अंतराने २ -३ वेळा फवारावे.
 • दलदल होऊ देवू नये. खतमात्रा योग्यवेळी द्याव्यात.
 • उसाच्या कुजलेल्या कांड्यांचा अनानासासारखा वास येतो.  कार्बेन्ड्झिम + मेलेथियानची बेणेप्रक्रिया करावी.  जमीन निचऱ्याची असावी.  मोठी बांधणी चांगली करावी.  ऊस लोळणार नाही याची काळ्जी घ्यावी. १ ग्रॅम बाविस्टीन १ लिटर पाणी याचं मिश्रण फवाराव.
 • उसावर मर या रोगाचा प्रादुर्भाव होतो.  बेण निरोगी असाव.  निचऱ्याची जमीन असावी.  कार्बेन्ड्झिम + मेलॅथीयानची बेनेप्रक्रिया करावी.  कांडी पोखरणाऱ्या आळीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस एकरी २ लिटर + २०० लिटर पाणी याचं मिश्रण फवारावे.
 • पानावरच्या ठिपक्यांच्या रोगामुळे पान करपून वाळतात.  ३ ग्रॅम मॅकोझेब + १ लिटर पाणी याचं मिश्रण १० दिवसांच्या अंतराने २ – ३ वेळा फवारावे.
 • उसवरचा केवडा विशेषतः खोडव्यात केवडा दिसतो.  १० किलो फेरस – सल्फेट अगर झिंक  सल्फेट शेणखतातून जमिनीत द्यावे.  एकरी ५०० ग्रॅम फेरस सल्फेट + ५०० ग्रॅम झिंक  सल्फेट + २.५ किलो युरिया + १०० लिटर पाणी या मिश्रणाच्या २ – ३ फवारण्य १० दिवसांच्या अंतराने कराव्यात.  उसवरच्या या नुकसानकारक रोगाव्यातिरिक्त पांगशा फुटणे, मोझॅक, करपा, पिवळसर ठिपके, तपाकीरी ठिपके, वाढ खुंटणे, पानावरचे पिवळे पट्टे, मूळ कुजव्या, इ.  रोगांचाही प्रादुर्भाव होतो.  त्याचं वेळीच नियंत्रण कराव.  प्रतिबंधात्मक उपाय म्हणून – हंगामनिहाय जातनिहाय उसाची लागवड करावी.
 • बेणेमळ्यातील रोगमुक्त बेण वापराव.
 • लागण कोरड्यात करावी.
 • ट्रायकोडर्माचा अवश्य वापर करावा.
 • पिकाची फेरपालट करावी.
 • खोडव्याचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करावे.
 • पाणी – व्यवस्थापन – खत – व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावं म्हणजे उसाच निरोगी उत्पादन मिळू शकेल.
 • बाविस्टीन १०० ग्रॅम + ३०० मि. लि. मेलेथियान + १०० लिटर पाणी यांची बेणेप्रक्रिया करावी.

48 total views, 0 views today