413709

कॉलेज कट्टा

मुखवटा

आपल्या समोर जे चेहरे दिसतात
ते चेहरे नसून मुखवटे असतात.

बगळयांच्या मुखवट्याखाली कावळे असतात.
वाघांच्या मुखवट्यांखाली बोके असतात.

हरणाच्या कळपाला घेरणारे लांडगे असतात.
आयत्या शिकारीवर ताव मारणारे गिधाडे असतात.
होऊन गेले ते योगी महायोगी,संत,फकिर
त्यांच्या सारखे पुन्हा होणे नाही

आजच्या घडीला योगीच्या मुखवट्याखाली भोगी असतात.
प्रजनन क्रियेला न शिवणारे ‘योगी’
असे बिंबवणारे ‘भाट’ चाकरीला असतात.

योगी वस्त्र परिधान करुन विविध मार्गांनी
सत्ता भोगणारे सत्ताकांक्षी असतात.
फकिराच्या वेशात गांव लुटणारे
अलिबाबा चाळीस चोर असतात.

आदर्शवादी मुखवट्यांची भळतीच चलती आहे.
स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवणाय्रांची मोठी गर्दी आहे.
तू राष्ट्रवादी, तू राष्ट्रद्रोही प्रमाणपत्रांची खुप विक्री आहे.
मुखवटे विकणाय्रा बाजार बसव्यांना सुगीचे दिवस आहे.
मोहंमद युसुफ.
९७६४२५००५८.

1,261 total views, 5 views today

गीत गाऊनी

गीत गाऊनी झोपविले पक्षांनी.

तांबडं फुटल्यावर उठविले पक्ष्यांनी.

विठु नामाचा गजर दुमदुमळा मंदिरांनी

ठसे उमटविले तालांवर पावलांनी

लखलखले अंतर्मन अभंग संतांचे ऐकोनी.

डोंगरमाथ्यावर ऊन चढले सावली सांडुनी.

गरगरा फिरल्या सावल्या झांडांच्या फांदीतुनी

रेंगाळल्या छटा क्षीतीजावरती काळोखाच्या

गेले अंधारुनी पुन्हा गीत गाऊनी झोपविले पक्षांनी.

-मोहंमद युसूफ.

९७६४२५००५८

1,364 total views, 5 views today

राधा…. राधा…

गोवाले बोले ,
राधा, राधा, तेरा कान्हा काला
‘तु’ चंद्रमा जैसी गोरी फिर भी फॅंस गई छोरी
राधा बोली,
मेरा कान्हा सबसे न्यारा सबसे निराला
उसे नजर ना लगे इसलिए वह काला.
गोवाले बोले ,
राधा राधा तेरा कान्हा चोर
राधा बोली,
वह मेरे मन को लगाये घोर
वह चोर नहि वह है चितचोर
गोवाले बोले ,
राधा राधा तेरा कान्हा मन को लुभाये
बासुरी बजाये वह है बडा जादुगर
राधा बोली,
वह बासुरी है बेजान
मेरा कान्हा फुके सुर उसमे जान
बासुरी गाये मेरा गुणगान
गोवाले बोले ,
राधा राधा तेरा कान्हा बडा लुटेरा
तेरे सहिलीयों के भी मन में किया बसेरा
वह कैसा होगा तेरा
राधा बोली ,
गोवाले, तुम बडे हो झुठीयारो
मेरा कान्हा नटखट
वह विश्र्वव्यापी होकर
बचा रहा मेरे मन के अंदर
– मोहंमद यूसुफ सय्यद
मो. ९७६४२५००५८

1,599 total views, 5 views today

ऊर्जा

अनादि काळापासुन निर्माण होणाऱ्या
ज्वाळांच्या सूर्याशी नजर भिडवून टाक.
होऊन कर्तृत्वरुपी इंद्रधनुष्य
संपूर्ण आकाश व्यापून टाक.
अबला नारी हा
स्त्रीत्वाला लागलेला कलंक मिटवून टाक.
स्वकतृत्वाचा डंका या जगात बाजवून टाक.
स्त्रीत्व हे,
जीवनाला पडलेलं सुंदर रम्य स्वप्न आहे.
स्वप्नभंग करणाऱ्या विचारधारेला गाडून टाक.
माझी कन्या ओळख पुसून
कन्येचा बाप ही ओळख मिरवून टाक.
पृथ्वीचा आत्मा,ऊर्जा तू होऊन जा
होऊन ऊर्जा सर्वांना कवेत घेऊन टाक.
– मोहंमद यूसुफ सय्यद
मो. ९७६४२५००५८

1,572 total views, 5 views today

407 total views, 1 views today