413709

गहू लागवड

गहू लागवड

प्रस्तावना

गहू एक महत्त्वपूर्ण रबी धान्य आहे, ज्याची भारतात एकूण अन्नधान्य उत्पादनाच्या जवळपास 3 टक्के भागीदारी आहे. यद्यपि येथे अनेक जाति आहेत.महाराष्ट्रात सन २०१४-१५ या वर्षात गव्हाखाली एकूण ८.९५ लाख हेक्टर क्षेत्र होते तर उत्पादन १२.३६ लाख टन मिळाले आणि उत्पादकता १३.८१ किंव./हे. होती. भारताच्या तुलनेत (राष्ट्रीय उत्पादकता २९.८९ क्वीं./हे.) महाराष्ट्रातील गव्हाची उत्पादकता ही देशाच्या उत्पादकतेपेक्षा खूपच कमी आहे. महाराष्ट्रातील उत्पादकता कमी असण्याची बरीच कारणे आहेत. पूर्वी महाराष्ट्रात गव्हाचे बागायती क्षेत्र खूपच कमी होते. परंतु, आता बागायती क्षेत्र बरेच वाढलेले आहे. गव्हाच्या पिकाखालील बागायती क्षेत्रात जसजशी वाढ होत गेली तसतसे एकूण उत्पादन आणि सरासरी उत्पादन वाढलेले आढळून आले आहे. यामध्ये अधिक उत्पादन देणा-या गव्हाच्या वाणांचा प्रमुख वाटा आहे.

महाराष्ट्रातील गव्हाच्या कमी उत्पादकतेची कारणे

 1. हलक्या ते मध्यम जमिनीत गव्हाची लागवड.
 2. गहू पिकासाठी पाण्याची करतरता.
 3. पाण्याची उपलब्धता असल्यास इतर पिके घेण्याचा कल.
 4. शिफारस केलेल्या वाणाची लागवड न करणे.
 5. गहू पीक वाढीच्या सुरवातीच्या दाणे भरण्याच्या व पक्व होण्याच्या अवस्थेत जास्त तापमान.
 6. हवामानातील वेळोवेळी होणारे बदल.
 7. शिफारशीपेक्षा कमी खताचा वापर.
 8. कोड व रोगांचा प्रादुर्भाव.
 9. १५ डिसेंबरनंतर गव्हाची पेरणी.
 10. नवीन प्रसारित वाणांचे योग्य प्रतीच्या बियाण्याची उपलब्धता न होणे.

जमीन

गहू पिकासाठी चांगल्या निच-याची भारी आणि खोल जमिनीची निवड करा. हलक्या व मध्यम जमिनीत भरपूर भरखते घालणे आवश्यक आहे. जिरायत गहू ओलावा टिकवून धरणा-या भारी जमिनीतच घ्यावा.
पेरणीची वेळ – जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुस-या पंधरवड्यात करावी. बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी. त्यासाठी जमिनीची पूर्वमशागत करून जमीन तयार ठेवावी.

हवामान

गहू पिकासाठी थंड, कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असणारे हवामान चांगले मानवते. गहू पिकाच्या वाढीसाठी ७ ते २१ अंश सें.ग्रे. तापमानाची आवश्यकता असते. दाणे भरण्याच्यावेळी २५ अंश सें.ग्रे. इतके तापमान असल्यास दाण्यांची वाढ चांगली होऊन दाण्यांचे वजन वाढते.

पूर्वमशागत

गव्हाच्या मुळ्या ६० सें.मी. ते १.00 मीटर खोलीपर्यंत वाढत असल्याने गव्हाच्या योग्य वाढीसाठी जमीन चांगली भुसभुशीत असणे आवश्यक आहे. यासाठी खरिप पीक काढणीनंतर लोखंडी नांगराने १५ ते २० सेमी खोलवर जमिनीची नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या ३ ते ४ पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणी अगोदर २५ ते ३० बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पसरवून टाकावे. तसेच पूर्वीच्या पिकांची धसकटे व इतर काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे.

 

बियाणे आणि बीजप्रक्रिया

 • गव्हाच्या  अधिक उत्पादनाकरिता हेक्टरी २0 ते २२ लाख झाडे शेतात असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रती हेक्टरी १oo किलो बियाणे वेळेवर पेरणीसाठी वापरावे.
 • उशिरा पेरणीसाठी कमी तापमानामुळे गव्हाच्या पिकास कमी फुटवे येत असल्यामुळे बियाण्याचे प्रमाण १२५ ते १५० किलो प्रती हेक्टरी एवढे ठेवावे. जिरायत पेरणीसाठी ७५ ते १00 किलो प्रती हेक्टरी बियाण्याचा वापर करावा.
 • पेरणीपूर्वी बियाण्यास  कॅप्टन किंवा थायरम या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तसेच प्रती १० किलो बियाण्यास अॅझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धन यांची प्रती २५0 ग्रॅम या प्रमाणे बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. यामुळे उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते.

पेरणी

गव्हाच्या वेळेवर आणि जिरायत पेरणीसाठी दोन ओळीत २0 सें.मी. तर उशिरा पेरणीसाठी १८ सें.मी. अंतर ठेवून पाभरीने पेरणी करावी. तसेच पेरणी ५ ते ६ सें.मी. खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. गव्हाची पेरणी उभी आडवी न करता एकेरी करावी म्हणजे आंतरमशागत करणे

२० सें.मी. खोलवर जमिनीची नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या ३ ते ४

सोईचे होते. शक्यतो पेरणी दक्षिणोत्तर करावी.

प्रचलित वाण

सध्यस्थितीत महाराष्ट्रात विविध परिस्थितीसाठी खालील वाण प्रसारित करण्यात आलेले आहेत.

वाणाचे नाव वैशिष्टे
कोरडवाहू लागवड
पंचवटी

(एन.आय.दि.ए.डब्लू-१५

(१) जिरायती पेरणीसाठी उत्तम बन्सी वाण(२) दाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक (३) प्रथिनांचे प्रमाण (एन.आय.डी.ए.डब्लू-१५ ) १२ टक्के (४) तांबेरा रोगास प्रतिकारक (५) रवा, शेवया, कुरडया यासाठी उत्तम (६) १o५-११० दिवसात कापणीस तयार (७) उत्पादन १२ ते १५ किंवटल प्रती हेक्टर नेत्रावती
नेत्रावती

(एन.आय.ए.डब्लू १४१५)

(१) द्विपकल्पीय विभागातील जिरायतीत किंवा एका ओलिताखाली वेळेवर पेरणीसाठी (२) तांबेरा रोगास (एन.आय.ए.डब्ल्यू. १४१५) प्रतिकारक (३) प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा जास्त (४)चपातीसाठी उत्तम (५) लोह ४३ पीपीएम, जस्त ५५.५ पीपीएम (६) उत्पादन : जिरायत १८ ते २० किंव./हेक्टर, एक सिंचन २२ ते २५ किंव./हेक्टर बागायती वेळेवर पेरणी त्र्यंबक
बागायती वेळेवर पेरणी
त्र्यंबक

(एन.आय.ए.डब्लू ३०१)

(१) बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम सरबती वाण (२) दाणे टपोरे आणि आकर्षक (३) प्रथिनांचे प्रमाण१२ टक्क्यांपेक्षा अधिक (४) तांबेरा रोगास प्रतिकारक (५) चपातीसाठी उत्तम वाण

(६) ११o-११५ दिवसात कापणीस तयार (७) उत्पादन ४५ ते ५o किंवटल प्रती हेक्टर तपोवन

तपोवन

(एन.आय.ए.डब्लू – ९१७)

(१) बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम सरबती वाण (२) दाणे मध्यम परंतु ऑब्यांची संख्या जास्त (एन.आय.ए.डब्ल्यू-९१७) (३) प्रथिनांचे प्रमाण १२.५ टक्के (४) तांबेरा रोगास प्रतिकारक (५) चपातीसाठी उत्तम वाण (६) ११५- १२० दिवसात कापणीस तयार (७) उत्पादन ४५ ते ५o किंवटल प्रती हेक्टर
गोदावरी (एन.आय.डी.डब्ल्यू- २९५) १) बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम बक्षी वाण (२) दाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक (३) प्रथिनांचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा अधिक (४) तांबेरा रोगास प्रतिकारक (५) रवा, शेवया, कुरडया यासाठी उत्तम (६) ११५ – १२० दिवसात कापणीस तयार (७) उत्पादन ४५ ते ५o किंवटल प्रती हेक्टर
फुले समाधान (एन.आय.ए.डब्ल्यू- १९९४) (१) महाराष्ट्र राज्यातील बागायत वेळेवर आणि बागायत उशिरा पेरणीसाठी योग्य (२) तांबेरा रोगास प्रतिकारक (३) प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा जास्त (४) चपातीसाठी उत्तम (५) उत्पादन : वेळेवर पेरणी- ४५ ते ५० किंवटल प्रती हेक्टर तर उशिरा पेरणी – ४२ ते ४५ किंवटल प्रती हेक्टर
एम.ए.सी.एस.- ६२२२ (१) द्विपकल्पीय विभागात बागायती वेळेवर शिफारशीत सरबत्ती वाण (२) टपोरे दाणे (३) प्रथिने १२.५ टक्क्यांपेक्षा अधिक (४) तांबेरा रोगास प्रतिकारक (५) चपातीसाठी उत्तम वाण (६) ११५ ते १२० दिवसात कापणीस तयार (७) उत्पादन ४५ ते ५o किंवटल प्रती हेक्टर
एम.ए.सी.एस. – ६४७८ (१) द्विपकल्पीय विभागात बागायती वेळेवर शिफारशीत सरबत्ती वाण (२) टपोरे दाणे (३) प्रथिने १४ टक्क्यांपेक्षा अधिक (४)तांबेरा रोगास प्रतिकारक (५) चपातीसाठी उत्तम (६) सुक्ष्मअन्नद्रव्ये (उच्च पोषणमूल्ये) : लोह ४२.८ पी.पी.एम., जस्त ४४.१ पी.पी.एम.(प्रति दशलक्ष भाग) (७) पक्व होण्याचा कालावधी ११५ ते १२० दिवस (८) उत्पादनक्षमता ४७ ते ५२ किंवटल/हेक्टरी
बागायती उशिरा पेरणी
एन.आय.डी.डब्लू – ३४ (१) बागायती उशिरा पेरणीसाठी उत्तम सरबत्ती वाण (२) दाणे मध्यम आणि आकर्षक (३) प्रथिनांचे प्रमाण १३ टक्के (४) तांबेरा रोगास प्रतिकारक (५) चपातीसाठी उत्तम वाण (६) १oo ते १o५ दिवसात कापणीस तयार (७) उत्पादन ३५ ते ४० किंवटल प्रती हेक्टर
ए.के.ए.डब्ल्यू- ४६२७ (१) द्विपकल्पीय विभागात बागायती उशिरा पेरणीसाठी शिफारशीत सरबती वाण (२) तांबेरा रोगास प्रतिकारक (३) प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा जास्त (४) चपातीसाठी उत्तम (५) पक्व होण्याचा कालावधी बागायती वेळेवर पेरणीसाठी ९५-१oo दिवस (६) उत्पादनक्षमता बागायती उशिरा पेरणीखाली ४२ ते ४५ किंवटल/ हेक्टरी
ए.के.ए.डब्ल्यू- ४२१o (१) महाराष्ट्रातील बागायती उशिरा पेरणीसाठी शिफारशीत सरबती वाण (२) तांबेरा रोगास प्रतिकारक (३) प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा जास्त (४) चपातीसाठी उत्तम (५) पक्व होण्याचा कालावधी बागायती वेळेवर पेरणीसाठी ९५-१oo दिवस (६) उत्पादन ४२ ते ४५ किंवटल प्रती हेक्टर.

टिप: गव्हाच्या कल्याण सोना, सोनालीका आणि लोक  वन या जाती तांबेरा रोगास बळी पडत असल्यामुळे त्याची लागवड करु नये

रासायनिक खते

गहू पिकासाठी रासायनिक खतांच्या मात्रा जिरायत, बागायत वेळेवर व बागायत उशिरा पेरणीसाठी वेगवेगळ्या शिफारस केलेल्या आहेत.

पेरणीच्या वेळी नत्र

(किलो हेक्टर)

स्फुरद

(किलो हेक्टर)

पालाश

(किलो हेक्टर)

बागायत वेळेवर पेरणी १२० ६० ४०
बागायत उशिरा पेरणी ८० ४० ४०
जिरायत पेरणी ४० २० 00

बागायती गहू पिकासाठी अर्धे नत्र , संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व राहिलेले अर्धे नत्र पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर आणि पहिल्या पाण्याच्या पाळी अगोदर द्यावे. जिरायत पेरणी करताना नत्र आणि स्फुरद पेरणीच्यावेळी द्यावे .

माती परीक्षणाद्वारे गहू पिकातील खात व्यवस्थापन

नत्र ( कि./हे.)= (७.५४ *अपेक्षित उत्पादन )- (०.७४ * जमिनीतील उपलब्ध नत्र कि./हे.)

स्फुरद (कि./हे.)=(१.९० * अपेक्षित उत्पादन )- (२.८८ * जमिनीतील उपलब्ध नत्र कि./हे.)

पालाश (कि./हे.)=(१.९० * अपेक्षित उत्पादन )-(०.२२ * जमिनीतील उपलब्ध पालाश कि./हे.)

आंतरमशागत

पेरणीपासून ३० ते ४० दिवसाचे आत तणाचे प्रमाण लक्षात घेवून एक किवा दोन वेळा निंदण करावे. रूंद पानी तणांच्या बंदोबस्तासाठी २,४- डी (सोडीयम साल्ट) या तणनाशकाची प्रती

हेक्टरी १ किलो क्रियाशील मूलद्रव्य ५०० लीटर पाण्यात मीसळून फवारणी करावी. ही फवारणी पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी करावी.

खते

अ) हेक्टरी २५ ते ३० गाड्या शेणखत कुळवाच्या पाळीने मिसळावे.
ब) बागायती गव्हास वेळेवर पेरणीसाठी हेक्टरी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे. निम्मे नत्र व संपुर्ण स्फुरद व पालाश पेरणीचेवेळी पेरून द्यावे. उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर द्यावे.
क) उशीरा पेरणीसाठी हेक्टरी ८० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश ही खते वरीलप्रमाणेच दोन हप्त्यात द्यावे.
ड) जिरायत गव्हास पेरणीच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्र आणि २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश द्यावे.
इ) पेरणीपूर्वी बियाण्यावर अँझोटोबँक्टर आणि सफुरद विरघळविणा-या जीवाणुंची २५० ग्रँम प्रती १० किलो याप्रमाणे बियाण्यावर बिजप्रक्रीया करावी.

पाणी व्यवस्थापन

बागायत वेळेवर आणि बागायत उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकासाठी जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या पाळ्या कमी-जास्त असू शकतात. पाण्याचा साठा एकच पाणी देण्याइतका उपलब्ध असेल, तर पेरणीनंतर 40 ते 42 दिवसांनी पाणी द्यावे. पाण्याचा साठा दोन पाणी देण्याइतका उपलब्ध असेल, तर पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी आणि दुसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे. पाण्याचा साठा तीन पाणी देण्याइतका उपलब्ध असेल, तर पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी, दुसरे पाणी 42 ते 45 दिवसांनी आणि तिसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे. तथापि, गहू पिकाच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत, त्या वेळी पिकास पाणी देणे फायद्याचे आहे. त्याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे

पीकवाढीची अवस्था                          पेरणीनंतरचे दिवस

1. मुकुटमुळे फुटण्याची वेळ                     18 ते 21
2. कांडी धरण्याची वेळ                               40 ते 45
3. पीक ओंबीवर येण्याची वेळ                   60 ते 65
4. दाण्यात चीक भरण्याची वेळ                 80 ते ८५

गव्हावरील किडीचे एकिकृत व्यवस्थापण

महाराष्ट्रात गव्हाची लागवड दोन प्रकारे करण्यात येते. जिरायत पध्दत व बागायत पध्दत म्हणुन . गहु आपल्या भागातील रबी हंगामातील एक महत्वाचे अन्नधन्याचे पिकआहे. या पिकावर अनेक किडीची नोंद करण्यात आली असली तरी आपल्या विभागात यापिकावर मुख्यतःखोड किडी, तुडतुडे, मावा, वाळवी इत्यादीव प्राण्यामध्ये उंदराचा प्रादुर्भाव होतो. त्याची व्यवस्थापनाबाबतची माहिती या ठिकाणी दिलेली आहे.

खोडकिडाःSesamia inferens Walker (Noctuidae : Lepidoptera)

या किडीचे पतंग तपकिरी रंगाचे व गवती रंगाचे असतात. पुर्ण वाढ झालेली अळी सुमारे २-३ से.मि असुन तिचा रंग गुलाबी असते. ती अंगाने मु आणि डोके काळे असते. या किडीचच्या प्रादुर्भावाने वाढणारा मधला भाग सुकुन जातो. अी खोडात शिरुन खालीलस भागवर उपजिवीका करते. त्यामुळे रोपे सुकुन जातात. व त्यांना ओंब्या येत नाही.

या किडीचे नियंत्रणासाठी  उभ्या पिकातील किडग्रस्त झाडे आठवड्याचे अंराने २-३ वेळा मुळासकट ुपडुन नास करावा. तसेच पिकाखाली फवारणी झाल्यावर उपद्रव ग्रस्त शेतातील धसकटे एकत्र करुन जाळावित. उभ्या पिकतात पिक पोटरीवर येण्याचे सुमारास हेक्टरी २ किलो कार्बारील ५० टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी ५०० लिटर पाण्यात मिसळुन फवाराणी करावी.

तुडतुडे

हे किटक आकारने लहान व पाचरीच्या आकाराचे असतात. त्यांचा रंग हिरवट राखडी असतो. तुडतुडे व त्यांची पिल्ले पानातुन रस शोषन करतात. त्यामुळे पाने पिवळी पडुन ती वाळु लागतात. व पिकांची वाढ खुंटते. या किडीचे नियंत्रणासाठी प्रादुर्भाव दिसुन आल्यावर डायमेखोएट ३० टक्के प्रवाही ३०० मिली. किंवा मिथाईल डिमेटाईल २५ टक्के प्रवाही ४०० मिलि किंवा पेन्थीऑन ५० टक्के २०० मिलि. किंवा कार्बारील ५० टक्के पाण्यात मिसळणआरी भुकटी १ किंलो प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळुनफवीरणी करावी किंवा कार्बारील १० टक्के भुकटी हेक्टरी २० किलो या प्रमाणात घरळावी. आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी /धुरळणी १५ दिवसानी वरीलप्रमाणे करावी.

मावा Aphid : Aphis maidis Fab.

गव्हाचे पिकावर दोन प्रकारचे मावा दिसुन येतो. एकाचा रंग पिवळसर तर दुस-याचा रंग हिरवा असते. हेकिटक लाब व वर्तुळाकार असते

या किडीचे पिल्ले व प्रौढ मावा पानातुन व कोवळ्या शेंड्यातुन रस शोषन करतात. तसेच आपल्या शरीरातुन मधासाखा गोडव चिकट पदार्थ सोडतात. व त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते.या किडीचे नियंत्रण तुडतुड्या प्रमाणे करावे.

वाळवी किंवा उधई- Termite: Microtermes obesi (Termitidae: Isoptera)

ही किड सर्वांच्या परीचयाची आहे. व या किडीचा प्रादुर्भाव पिक वाढीच्या अवस्थेत दिसुन येतो. ही किड गव्हाच्या रोपाची मुळे खाते. व त्यामुळे रोपे वाळतात. व व सपुर्ण झाड मरते. वाळवाचा बंदोबस्त करण्यासाठी बांधावर असलेली वारूळे खणुन काढावित. व त्यातील राणीचा नाश करावा. वारुळ नष्ट केल्या नंतर जमीन सपाट केल्यानंतर मध्भागी सुमारे ३० से.मि. खोलवर एक छिद्र करावेत. आणि त्यात क्लोरपायरीफॉस २० टक्के प्रवाही हे किटकनाशक १५ मिलि. १० लिटर पाण्यात मिसळुन वारुळात वापरावे. वरील औषधाचे मिश्रन ५० लिटर एका वारुळासाठी पुरेसे होते. किंवा क्विनडलफॉस ५ दजाणेदार किंवा फोरेट १० टक्के दाणेदार किंवा कार्बोफ्युरॉन ३ % दाणेदार हेक्टरी २५ किलो जमिनीत टाकावे. आथवा शेनखताबरोबर द्यावे.

उंदीर

उंदीर गव्हाचे फुटवे व ओंब्या तोडून खातात आणि बिळात साठवितात. उंदीरांचा बंदोबस्त करण्यासाठी विषयुक्त आमिषांचा वापर करावा. हे आमिष तयार करण्यासाठी धान्याचा भरड ४९ भाग, थोडे गोडे तेल व १ भाग झिंक फॉस्फाईड किंवा ब्रोमाडिऑलान एकत्र मिसळावे. चमचाभर (आंदाजे १० ग्रॅम) विषारी आमिष प्लॅस्टिकच्या पिशवित टाकून शेतातील जिवंत बिळामध्ये टाकावे.

रोग व त्यांचे व्यवस्थापन

१)तांबेराः

हा हवेव्दारे पसरणारा बुरशीजन्य रोग आहे. या रोगामुळे पानांवर विखुरलेले नारिंगी रंगाचे फोडे येतात, जे पुढे काळे पडतात. या फोडांमध्ये बुरशीची बीजे असतात. तांबे-यापासून नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधक वानांचा वापर करावा.(उदा. एचडी २१८९, पूर्णा, एकेडब्ल्यू ३८१ व एचआय ९७७)

तांबे-याची लागण दिसताच मॅन्कोझेब (डायथेन एम ४५) हे बुरशीनाशक २५ ग्रॅम, १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. रोगाची तीव्रता लक्षात घेउन  १० ते १५ दिवसांचे अंतराने फवारण्या कराव्यात.

२)काजळी किंवा काणीः

या रोगाचा प्रसार बियाण्याव्दारे होते. रोगाट ओंब्यामध्ये दाण्याऐवजी काळी भुकटी तयार होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास व्हिटॅव्हॅक्स किंवा कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाची २.५ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बिज प्रक्रिया करावी, तसेच शेतातील रोगट झाडे मुळासकट उपटून नष्ट करावीत.

३)पानावरील करपाः

गव्हावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाचे प्रादुर्भाव दिसताच मॅन्कोझेब हे बुरशीनाशक २५ ग्रॅम + १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.

उशिरा बागायती गव्हाची पेरणी

ऊसतोडणीनंतर, कापसाचे पीक काढल्यानंतर किंवा सोयाबीन व खरिपातील इतर पिकांच्या काढणीस उशीर झाल्याने शेतक-यांना गव्ह्याची उशिरा पेरणी कराची लागते. बागायती उशिरा पेरणीची शिफारस १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरनंतरही गन्ह्याची पेरणी करतात. वास्तविक, १५ नोव्हेंबरनंतर पेरणी केलेल्या प्रत्येक उशिराच्या पंधरावड्यात गव्हाची पेरणी केल्याने गव्हाचे हेक्टरी २.५ क्रॅिटल किंवा एकरी १ किंटल कमी उत्पादन मिळते.

गहूपिकाचे उत्पादन हे पिकास मिळणा-या थंडीच्या कालावधीवर बहुतांशी अवलंबून असते. गहूपिकाच्या वाढीसाठी ७° ते २१° से. तापमानाची आवश्यकता असते. तसेच दाणे भरण्याच्या वेळी २५° से. इतके तापमान असल्यास दाण्याची वाढ चांगली होऊन दाण्याचे वजन वाढते. मात्र, उशिरा पेरणी केलेल्या गव्हास अनुकूल वातावरण मिळत नसल्याने उत्पादनात घट येते. खालीलप्रमाणे उपाययोजना केल्यास उत्पादनातील घट काही प्रमाणात भरून काढता येते.

● गव्हाच्या बागायती उशिरा पेरणीसाठी उपलब्धतेनुसार एनआयएडब्लू३४ किंवा एकेएडब्लू-४६२७ तसेच एनआयएडब्लू १९९४ (समाधान) या सरबती चाणांचा वापर करावा.

● उशिरा पेरणीसाठी गव्ह्याच्या दोन ओळींत १८ सेंमी. अंतर ठेवून पेरणी ५ ते ६ सेंमी. खोल पाभरीने शक्यतो दक्षिणोत्तर करावी.

● हेक्टरी रोपांची संख्या जास्त ठेवण्यासाठी विथाप्याचे हेक्टरी प्रमाण १२५ चे १५० केिली एवढे ठेवावे. पेरणी करताना हेक्टरी ४० कि. नत्र (८० कि. युरिया), ४० कि. स्फुरद (२४० केि. सिंगल सुपरफॉस्फेट) व ४० कि. पालाश (७५ कि. म्युरेट ऑफ पोटॅश) ही खते द्यावीत.

● पेरणीनंतर १५ ते २o दिक्सांनी पहिल्या पाण्याच्या अगोदर प्रति हेक्टर ४० कि. नत्र (८० कि. युरिया) द्यावे

● जमिनीत ओलावा राहून पीक क्षेत्रात थंड हवामान राहण्यासाठी पिकास नेहमीपेक्षा कमी अंतराने म्हणजे १५ दिवसांनी योग्य मात्रेत पाणी द्याचे. पीक क्षेत्रात तापमान कमी राहण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर करावा. तुषारने शेवटचे पाणी पेरणीनंतर ८० ते ८५ दिक्सांदरम्यान द्यावे.

● गहूपिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यानंतर काही वेळा गव्ह्यच्या दाण्यावर काळा डाग पडण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी दाणे भरताना तुषारवरील क्षेत्रात मॅन्कोझेब आणि काँपर ऑक्सिक्लोराईड प्रत्येकी २० मिलेि. १० लिटर पाण्यातून फवारावे.

विकसित होताहेत गव्हाच्या जाती

गुजरातमधील जुनागढ कृषी विद्यापीठाच्या गहू संशोधन केंद्राने प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टीने गव्हाच्या जाती विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सध्या या संशोधन केंद्रामध्ये वाढत्या तापमानाचा ताण सहन करणाऱ्या जातींच्या निर्मितीबाबत संशोधन सुरू आहे. या केंद्रातील संशोधनाबाबत अधिक माहिती देताना गहू तज्ज्ञ बी. ए. कुनादिया म्हणाले, की येत्या दोन वर्षांत आम्ही प्रक्रिया उद्योगाची मागणी लक्षात घेऊन ब्रेड, चपाती, मॅकारोनी आणि बिस्कीट निर्मितीसाठी जाती विकसित करणार आहोत.

गुजरातमधील सौराष्ट्र विभागात थंडीचा कालावधी इतर भागांपेक्षा कमी आहे, त्यामुळे या भागातील शेतकरी पावसाळा संपताच लगेच गव्हाच्या लागवडीस सुरवात करतात, त्यामुळे इतर भागांपेक्षा येथे ३० टक्‍क्‍यांनी उत्पादन कमी येते. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन कमी थंडीतही चांगले उत्पादन देणाऱ्या जातींच्या निर्मितीवर आम्ही भर दिला आहे. आमच्या संशोधन केंद्राने यापूर्वी तांबेरा प्रतिकारक आणि अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित केलेल्या आहेत.

क्षारप्रतिकारक गहू

ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी गव्हाची क्षार सहनशील सुधारित जात यापूर्वी विकसित केली आहे. ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ सायंटिफिक ऍण्ड रिसर्च ऑर्गनायझेशन (सीएसआयआरओ) या संस्थेतील प्लांट इंडस्ट्री रिसर्च विभागातील शास्त्रज्ञांचे हे संशोधन आहे. ट्रिटिकम मोनोकॉकम या जातीच्या गव्हातील क्षार सहनशीलतेसाठी कारणीभूत असलेली एनएएक्‍स १ आणि एनएएक्‍स २ ही दोन जनुके या प्रयोगात वेगळी करण्यात आली.

ड्युरम जातीच्या गव्हामध्ये ती टाकण्यात आली. मॉलिक्‍युलर मार्कर पद्धतीचा वापर त्यात करण्यात आला. या जनुकांमुळे सोडिअम या विषारी क्षाराच्या मुळापासून शेंड्याकडे होणाऱ्या वहनाला अडथळा आणला जातो. क्षारपड जमिनींमध्ये ही जात सध्याच्या जातींच्या तुलनेत २५ टक्के अधिक उत्पादन देते, असे आढळले आहे.

कापणी व मळणी

गव्हाची जिरायत आणि बागायत पेरणी करुन पीक तयार झाल्यानंतर परंतु दाण्यामध्ये १२ टक्के पाण्याचे प्रमाण असताना पिकाची कापणी अशाप्रकारे तांत्रिक पद्धतीने गव्हाची पेरणी केल्यास जिरायत गव्हाचे प्रती हेक्टरी १२ ते १५ किंवटल तर बागायत वेळेवर गव्हाचे प्रती हेक्टरी

४५ ते ५o किंवटल आणि बागायत उशिरा गव्हाचे प्रती हेक्टरी ३५ ते

गव्हास एकच पाणी दिले तर पुरेशा पाण्यापासून आलेल्या उत्पादनाच्या

४0 किंवटल उत्पादन निश्चित मिळेल.

147 total views, 0 views today