413709

जागृत सुर्यमुखी हनुमान मंदिर

जागृत सुर्यमुखी हनुमान मंदिर
                 श्रीरामपुरमधील हे सर्वात जुने असे जागृत सुर्यमुखी हनुमान मंदिर आहे.मंडळाचे अध्यक्ष श्री.सुनिल डहाळे यांना भट्टीचे काम करत असताना  हनुमानाची छोटी मुर्ती याठिकाणी सापडली, त्यानंतर या मुर्तीची स्थापना करण्यात आली.१९८७ साली जागृत सुर्यमुखी हनुमान मित्र मंडळाची स्थापना झाली.१९८७ साली सुनील डहाळे, डॉ. पांडे, डॉ.बाबा नागर, विष्णु लबडे, विजय टेलर यांनी जुन्या मंदिराची पुनर्रचना केली. नगरपालिकेचे कर्मचारी शकुर चावरीया यांनी स्व. राजेश शकुर चावरीया यांच्या स्मरणार्थ महादेवाचे मंदिर, गणपती मंदिर, दुर्गा माता मंदिर(राजेश्वरी मंदिर), कालिका माता मंदिर या मंदिराची स्थापना केली. त्याचप्रमाणे श्री गिरजा माता व मांगिर बाबा हे मंदिरही या हनुमान मंदिराशेजारी आहे.

                 याठिकाणी मित्रमंडळाबरोबरच महिला मंडळही स्थापन झालेले आहे. हे महिला मंडळ याठिकाणी दर शनिवारी हनुमान चालीसा, प्रवचन, भजन, आरती असे कार्यक्रम घेतात.

                  हनुमान जयंती निमित्त येथे चार हजाराहुन अधिक भक्त येत असतात.त्यांच्यासाठी पाण्याची सोय म्हणुन राजेश जलकुंभ आहे.प्रत्येक शनिवारी येथे खिचडीचा प्रसाद वाटला जातो.

                या परिसरात वडाचे झाड, लिबांचे झाड, पिंपळाचे झाड अशी झाडे असल्यामुळे याला पंचमुखी बन असे नाव देण्यात आले.