413709

धर्मनाथ बीज आप्पा कुलकर्णी

धर्मनाथ बीज


 धर्मनाथ बीजाबाबत आप्पा कुलकर्णी मार्गदर्शन करतांना

 

 

धर्मनाथ बीज उत्सव आप्पा कुलकर्णी श्रीरामपुर

 

 

 

धर्मनाथ बीज फोटो गॅलरी

         धर्मनाथ बीज हा उत्सव नाथपंथातील महत्वाचा उत्सव आहे. या दिवशी धर्मनाथ राजा त्या काळाच्या गुरुकुलरुपी तिथे श्री सद्गुरु गोरक्षनाथांनी अनुग्रह दिला आणि नवीन प्रणय पाडला कि नाथपंथ हा संन्यासी असताना लोक संन्यासी होतात हा गैरसमज अपप्रचार थांबविण्याच्या दृष्टीने त्यांनी धर्मनाथांना त्या दिवशी अनुग्रह दिला आणि राज्याच्या सिंहासनावर बसवले.

       थोडक्यात जे संसार करतात अशा लोकांना नाथांनी  सेवा करण्याची परवानगी दिली. हा पंथ म्हणजे संन्यासाचा पंथ न राहता सगळ्यांसाठी खुला केला. माणसानी गोरक्षनाथ किंवा कुठल्याही नाथाची सेवा केल्यानंतर तो मनुष्य घरदार सोडतो हा अपप्रचार बंद करण्याकरिता पुढचे भविष्य ओळखून त्या दिवशी गोरक्षनाथांनी त्या दिवशी अनुग्रह देउन त्यांना राज्यसनावर बसवले. त्यांनी वचन दिले की ज्या ठिकाणी उत्सव असेल त्या ठिकाणी मी क्षणमात्र तरी मी येऊन जाईल.

      युपी किंवा एमपी मध्ये हा उत्सव सक्रांतीच्या दिवशी खिचडी या रुपाने केला जातो. नाथपंथाचा मुळ उद्देशच असा आहे कि प्रत्येक जातीच्या माणसाला एवढे महत्व आहे. हा सर्वांसाठी सेवेचा शक्तीमार्ग म्हणून मोकळा केलेला आहे.