413709

न्यु साईनाथ शु पॅलेस

न्यु साईनाथ शु पॅलेस (श्रीरामपूर )

( मोबाईल नं. : ०२४२२ – २२८१७५ )

श्रीरामपुर मधील फुटवेअरचे सर्वोत्कृष्ट दुकान म्हणजे किशोर बत्रा यांचे न्यु साईनाथ शु  पॅलेस होय.  हे दुकान शिवाजी रोड वरील किशोर टॉकीज शेजारील शंकर कॉम्प्लेक्स मध्ये आहे. या दुकानाची स्थापना १९८२ ला मेनरोडवरील गांधीपुतळ्या जवळ झाली. त्यावेळी दुकानाचे स्वरुप हे छोटे होते. परंतु ग्राहकांचा प्रतिसाद पाहुन दुकानाचे स्वरुप मोठे करुन २० एप्रिल १९९६ साली शिवाजी रोड येथे दुकान सुरु करण्यात आले.

शुजच्या विविध व्हरायटी , विश्वासार्हता व आपलेपणाची वागणुक यामुळे दुकानामध्ये ग्राहकांची गर्दी वाढली म्हणुन या दुकानाच्या ४ शाखा उघडण्यात आल्या. त्यातील ३ शाखा श्रीरामपुर मध्ये असुन १ शाखा राहाता तालुक्यात सुरु करण्यात आली.

१) न्यु साईनाथ शु पॅलेस (श्रीरामपुर)

२) साईनाथ फुटवेअर (श्रीरामपुर)

३) साईचरण शु पॅलेस (श्रीरामपुर)

४) साईचरण शु पॅलेस (राहाता)

येथे नेहमीच शुज मध्ये विविध व्हरायटीज, डिझाईन व क्वॉलिटी आणण्याचा प्रयत्न केला जातो . या दुकानामध्ये लहानांपासुन मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी नामांकीत कंपन्यांचे (Action, relaxo, spark, paragon, bata, vivo, red chief, maddy, etc.) दर्जेदार फुटवेअर व सॉक्स उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे कॉटन सॉक्सही उपलब्ध आहेत.