413709

कालभैरवनाथ मंदिर(उंबरगाव)

कालभैरवनाथ मंदिर(उंबरगाव)


 

देवाचे नाव:- कालभैरवनाथ मंदिर

  पत्ता :- बेलापूर गाव,पढेगाव रोड,उंबरगाव

कालभैरवनाथ हे संपूर्ण मंदिर एक एकर क्षेत्रफळमध्ये वसलेले असून मुख्य गावापासून मंदिर 2 किमी अंतरावर आहे.उंबरगाव हे गाव पहिले उंबरेश्वर म्हणून ओळखले जायचे. प्रवरा या नदीला पूर आल्यामुळे उंबरेश्वर हे गाव अर्धा किमी लांब वसले व त्या गावाच्या ठिकाणी भैरवनाथ या मंदिराची स्थापना झाली.भैरवनाथ या मंदिरामध्ये भैरवनाथ व जोगेश्वरी माता या दोन्हीचे निवास स्थान आहे.व त्या समोर भव्य दिपमाळ आहे.भैरवनाथ या मंदिराशेजारी तुळजा मातेचे मंदिर असून त्यासमोर महादेवाची पिंड आहे.

या मंदिरात एप्रिल या महिन्यात भरपुर गर्दि असते.यात्रेच्या वेळेस गावात पालखी फिरवतात व वर्षातून तीनदा पालखी मिरवली जाते.यात्रेच्या वेळेस चविष्ट असा प्रसाद म्हणून दाळ,भात,लापशी केली जाते १९एप्रिल ला मंदिराच्या परीसरात यात्रा भरविली जाते.खूप मोठया संख्येने लोक या यात्रेस आनंदाने सहभागी होतात या यात्रेतील भजन व किर्तनाने लोक मंत्र-मुग्ध होतात.मंदिरामध्ये नारळ,फुलहार,तेल,प्रसाद,इ.चढवण्यासाठीही देखील दुकाने उपलब्ध आहेत.व पाण्याची व नाष्टा व जेवण करण्यासाठी हॉटेलची सोय उपलब्ध आहे.