413709

रब्बी ज्वारी – किडींचे व्यवस्थापन

रब्बी ज्वारी – किडींचे व्यवस्थापन 

रब्बी हंगामातील जचारीचे उत्पादन कमी होण्याची अनेक कारणे आहेत. त्यांपैकी किर्डीचा प्रादुर्भाव हे महत्चाचे कारण आहे. खोडकिडा, खोडमाशी, मीजमाशी, तुङ्तुडे, मावा, कोळी, कणसातील अळ्या, लष्करी अळ्या, हुमणी इत्यार्दीचा ज्वारीपिकांवर प्रादुर्भाव झाल्यास ३० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान होते. त्यामुळे ज्वारीपिकांवर येणा-या महत्चाच्या किडी व रोगांविषयी माहिती शेतकर्याना होणे आवश्यक आहे.

रोग

1. खोडमाशी : ही माशी लहान आणि करड्या रंगाची असते. अळीचा रंग पांढरा असतो. अधूनमधून पाऊस पडत असल्यास या किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. या किडीची अळी पोग्यात प्रवेश करून रोपाच्या वाढीचा खालचा भाग खाऊन नष्ट करते. या किडीचा प्रादुर्भाव यामुळे ज्चारीच्या धान्याचे ४० ते ५० टक्के आणि कडव्याचे ३० ते ३५ टक्के नुकसान होते.

2. खोइकेिड़ा : खड़किड़याचे पतंग मध्यम आकाराचे असतात. पोग्यातील पानाच्या वरच्या लहान लहान पारदर्शक व्रण आढळल्यास खोडकिड्यांचा प्रादुर्भाव झाला असे समजावे. कोवळ्या पानावर आडव्या रेषेत लहान-लहान छिद्रे पडलेली दिसतात. वाढणा-या शेंड्याला इजा होऊन विशिष्ट प्रकारची पौंगामर होते. किडीचा प्रादुर्भाव साधारण: पीक एक महिन्याचे झाल्यापासून कणसात दाणे भरेपर्यंत होऊ शकतो. अळी ताटात शिरल्यानंतर आतील गाभा खाते, त्यामुळे ताट आणि कणीस वाळते.

3. मावा : ज्वारीवर २ ते ३ प्रकारच्या मान्यांचा प्रादुर्भाव होतो. पहिल्या प्रकारातील माचा रंगाने निळसर हिरवा असतो; मात्र पाय काळे असतात. दुस-या प्रकारचा माचा रंगाने पिवळसर असून, तो जुन्या पानाच्या खालच्या बाजूवर आढळून येतो. अनुकूल परिस्थितीत या मान्याची एक आठवड्यात एक पिढी पूर्ण होते. हिरवा माचा पिकाच्या सुरुवातीच्या काळात पाँग्यात दिसून येतो. पाँग्यातील रस शोषून घेतल्यामुळे पाने पिवळी पडून कालांतराने वाळतात. या किंडीवर मोठ्या प्रमाणावर भक्षक भुगेयाची वाढ़ होते. मान्याच्या शरीरातून गोड़ पदार्थ बाहेर पड़तों आणि तो पानांवर पसरल्यामुळे काळी बुरशी वाढून तिचे थर जमतात. त्यामुळे झाडाची हरितद्रव्याच्या सहाय्याने सूर्यप्रकाशात अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते व विषाणुजन्य रोगाचा प्रसारही होतो.

4. तुड़तुड़े : तुड़तुड़े व त्याची पिले पोग्याच्या पानातील रस शोधून घेतात. किडीद्वारे झालेल्या इजेमुळे पानातून रस बाहेर पडून पानावर त्याचे साखरेत रुपांतर होते. त्यामुळे पान चिकट होऊन त्यावर काळी बुरशी वाढते. त्याला चिकटा पडला, असे म्हणतात. किडीच्या प्रादुर्भावामुळे पाने पिवळी पडून झाडाची वाढ खुंटते व कणीस बाहेर पडत नाही. किडीचे प्रमाण जास्त झाल्यास वरची पाने पिवळी पडून चाळतात.

5. मीज माशी : ही माशी अतिशय लहान असून तिचा पोटाकडचा भाग नारंगी व पंख पारदर्शक असतात. तापमान २५ ते ३00 सें. हवेतील आद्रता ६० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास अळ्या सुतावस्थेतून त्यामुळे कणसात दाणे भरत नाहीत. या किडीमुळे उत्पादनात ६० टक्के घट येते.

6. कोळी : कोळी रंगाने हिरवे असून पानाच्या खालच्या बाजूवर वाढतात. त्या पानाखालील जाळीमध्ये मादी अंडी घालते. किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या कडेने सुरू होऊन वा-याच्या दिशेने वाढतो. कोळी पानाच्या खालच्या बाजूस राहून पानावर या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला आहे. कालांतराने पूर्ण पान लालसर होऊन पाने चाळून जातात व ताटे जमिनीवर लोळतात.

7. लष्करी आळी : या किडीचे पतंग करड्या रंगाचे तर अळ्या काळ्या-चॉकलेटी रंगाच्या असतात. मादी पानाच्या देठाजवळ अगर जमिनीत २० ते १०० च्या समूहाने अंडी घालते. भरपूर पावसानंतर किंवा पावसाच्या ताणानंतर या किडीची वाढ झपाट्याने होते. अळया अधाश्यासारख्या पाने खाऊन फक्त मध्यशीरच शिल्लक ठेवतात. निसचत असलेल्या कणसातही या अळ्यांचा प्रादुर्भाव होतो.

किडीच्या प्रादुर्भावाची कारणे

 1. तापमान: २५ ते ३०० सें तापमानात ज्वारीवरील बहुतांश किडीची वाढ मोठ्या प्रमाणात होते. पिवळ्था मान्याची वाढ कमी तापमान १५ o सें आणि ढगाळ वातावरण असल्यास झपाटयाने होते.
 2. आद्रता : हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ६० ते ८० टक्के हे ज्वारीवरील किडीच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते. मात्र, पिवळा मावा, कोळी यांची वाढ त्यापेक्षा कमी आर्द्रता असतानासुद्धा होते.
 3. पाऊस : खरिपामध्ये तसेच ऑक्टोबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले असल्यास ज्वारीवर खोडमाशीचा प्रादुर्भाव जास्त होतो. एकदम जास्त पाऊस पडल्यास ज्वारीवरील ब-याच किडी नष्ट होतात. डिसेंबरमध्ये ढगाळ हवामान असेल, तर मान्याचा प्रादुर्भाव वाढतो. पावसाने ओढ़ दिली, तर अशा परिस्थितीत खरपुड़े, तुड़तुड़े, कोली इ. किड़ींचा प्रादुर्भाव वाढतो.
 4. जमिनीचा प्रकार : रब्बी ज्वारीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात हलकीमध्यम प्रकारच्या जमिनीत खाली येते. अशा जमिनीत ओलावा साठवण्यास आणि तो टिकवून ठेवण्यास मर्यादा येतात. पावसाच्या प्रमाणात घट आल्यामुळे तुड्तुडे, कोळा इ. किंडीचा प्रादुर्भाव वाढतो. भारी जमिनीची ओलाचा साठवण्याची आणि ती टिकवण्याची क्षमता जास्त असल्थामुले हवेंतील आर्द्रता वाढते. खोड़माशी, खड़किड़ा, मावा, कणसातील अळ्या यासारख्या किडीचे प्रमाण वाढते.
 5. पेरणीचा कालावधी : रब्बी ज्चारी सप्टेंबरच्या दुस-या पंधरवड्यात व नंतर पेरलेल्या ज्वारीवर खोडमाशीचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो. उशिरा पेरलेल्या ज्वारीला तुड्तुडे, माचा यांच्यापासून नुकसान पोहचते. एकाच परिसरात वेगवेगळ्या वेळेला पेरणी केल्यास ब-याच किडीचा प्रादुर्भाव वाढतो.
 6. ताटांची संख्या : ओलिताखाली १.८० लाख आणि कोरडवाहू १.४८ लाख ताटांची संख्या प्रतिष्हेक्टरी असावी, अशी शिफारस करण्यात आलेली आहे. तथापि हे प्रमाण कमी असल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो. यापेक्षा ताटांची संख्या जास्त असल्यास किडीपासून नुकसान कमी जाणवते.
 7. खतांची मात्रा : शिफारस केलेल्या रासायनिक खतांच्या मात्रा पिकास दिल्यास किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. परंतु, असमतोल आणि अयोग्य खतांच्या मात्रा दिल्यास केिडीचे प्रमाण वाढते.
 8. वाण : स्थानिक वाणाखाली रब्बी ज्वारीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. सुधारित वाण आणि संकरित वाण यांच्या खालील क्षेत्र अल्प अशा वाणांचा वारंवार वापर झाल्यास किडीचा प्रादुर्भाव सातत्याने दिसून येतो.

किडीचे एकात्मिक व्यवस्थापन

  1. मशागत : एक नांगरणी, दोन पाळ्या पेरणीपूर्वी देणे.
  2. स्वच्छता : मशागतीनंतर पूर्वीच्या पिकाची धसकटे, चिपाडे, बांधावरील गवत, तण काढून आणि वैचून एकत्र करून नष्ट करणे.
  3. किडींना कमी बळी पडणा-या सुधारित/संकरित वाणांची निवड करणे. सुधारित वाण : मालदांडी ३५-१, स्वाती, माऊली, फुले यशोदा, फुले वसुधा व फुले चित्रा.
  4. संकरित वाण : सी.एस.एच.१५ आर, सी.एस.एच.१९ आर
  5. बीजप्रक्रिया : कार्बोसल्फान २५ एस, डी.२00 ग्रॅ. प्रतिकेिली बियाण्यास किंवा थाथामेथोक्झाम ३५ एफ एस १o मिलिं. प्रतिकेिली वेियाणे,
  6. पेरणीची वेळ : सप्टेंबर दुसरा पंधरवडा
  7. खते : शिफारस केल्याप्रमाणे
  8. बियाण्याचे प्रमाण : १२ किलो प्रतिहेक्टर
  9. अंतर : दोन ओळींतील-४५ सेंमी. दोन रोपांतील -१५ सेंमी.
  10. प्रत्यक्ष कोड नियंत्रण उपाय : विरळणीपूर्वी खरपुड्यांचा प्रादुर्भाव दिसल्यास ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी
  11. प्रमाण- ५ केिली निंबोळी १०० लिटर पाणी.)
  12. विरळणी : पिकाची उगवण झाल्यानंतर १० ते १२ दिवसांनी खोडमाशीचा प्रादुर्भाव झालेली रोपे काढून नष्ट करून विरळणी करणे.
  13. आंतरमशागत : पहिली कोळपणी/खुरपणी पेरणीनंतर तीन आठवड्यांनी. दुसरी कोळपणी/खुरपणी पेरणीनंतर पाच आठवड्यांनी. तिसरी कोळपणी/खुरपणीनंतर आठ आठवड्यांनी करावी.
  14. प्रत्यक्ष कोइ नियंत्रण उपाय : पीक ३० ते ३५ दिवसांचे झाल्यावर खड़किड़ग्रस्त झाड़े कादून नष्ट कराचीत. किड़ग्रस्त झाड़ाचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त दिसल्यास ५ टक्के निंबोळी अर्काची अगर प्रति हेक्टर फवारणे. मावा, तुड़तुड़े यांच्या नियंत्रणासाती ५ टक्के निंबोळी अकांची फवारणी किंवा प्रवाही डायमेथोएट ५oo मिलेि. अथवा २५ टक्के प्रवाही मिथिल ड़िमेंटॉन ४00 मिलि. ५00 लिटर पाणी था प्रमाणात प्रति हेक्टर फवारणे. कोळी या किडीसाठी ३oo मेश गंधकाची २० किलो प्रति हेक्टर धुरळणी करावी.
  15. पीक काढणीनंतर नांगरट करून धसकटे वेचून जाळून टाकणे.

131 total views, 0 views today