413709

रेणुकादेवी आश्रम (वडाळा महादेव)

शिवशक्तीपीठ रेणूका आश्रम, वडाळा महादेव
श्री क्षेत्र रेणूकादेवी आश्रम वडाळा महादेव येथे मार्गदर्शन करताना
प. पू. श्री संत रेवणनाथ महाराज व आदीनाथ सर

श्री क्षेत्र रेणूकादेवी आश्रम वडाळा महादेव येथील फोटो गॅलरी

श्री क्षेत्र रेणूकादेवी आश्रम वडाळा महादेव google map 
संपू्र्ण पत्ता - श्री क्षेत्र रेणुकादेवी आश्रम, नेवासा रोड, वडाळा महादेव,श्रीरामपूर.

                    शिर्डी-शिंगणापूर दरम्यान मध्यवर्ती श्रीरामपूर – नेवासा रस्त्यावर रेल्वे ओव्हर ब्रीज ओलंडला की पाच मिनीटात नेवाशाकडे जातांना डाव्या बाजुला रस्त्याच्या खाली ‘श्री क्षेत्र रेणूकादेवी आश्रम’ अशी  कमान  झळकते.  आत गेले की या भव्य मंदिराची कल्पना येते.  मंदिराची रचना गावच्या सुप्रसिध्द गजानन महाराजांचे भुयारी मंदिराप्रमाणे असून  तळघरात  (भुयारात)  रेणूका  देवीच्या  मुर्तीची  प्रतिष्ठाण  असलेल्या  वडाळा महादेव गावात हे अधिष्ठाण निर्माण झाल्याने शिवशक्ती पीठ म्हणून पंचक्रोशीत परिचीत होत आहे.

                 आपल्या कर्तुत्वावर व परमेश्वरावर नितांत श्रध्दा ठेवून, नैतिक अधिष्ठानाला जर अथक प्रयत्नांची जोड मिळाली तर हाती घेतलेले कार्य हमखास सफल होते, याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे श्री रेणूका देवी मंदिर. तब्बल साडे बारा वर्ष “मौन व्रत” स्विकारुन आश्रमाचे प्रमुख प. पू. श्री संत रेवणनाथ महाराज यांनी हे मंदिर उभारले आहे. आज परिसरातील भाविकांचे ते श्रध्दास्थान बनले असून नवरात्र उत्सावात भाविकांची मोठी गर्दी असते.

थोडक्यात पूर्व इतिहास 

                 या आश्रमाचे प्रमुख संत रेवणनाथ महाराज आहेत. ते संसारी गृहस्थ आहेत. लहानपणापासून धार्मिकतेकडे ओढा अधिक आहे. नंतर सात ते आठ वर्ष एस. टी. ड्रायव्हरची नोकरी श्रीरामपूर व नेवासा डेपोत केली. एस.टी. सेवक असतानाच देवीचा दृष्टांत झाला. तेव्हापासून त्यांचे मन अधिक धार्मिकतेकडे वाटचाल करु लागले. सन १९७७ साली एस.टी. सेवेचा राजीनामा दिला नंतर श्रीरामपूर ते माहूर हा साडेतिनशे किलोमीटरचा प्रवास सहकुटुंब व दहा बारा भक्तांसोबत केला. माहूर येथे “मातृका तीर्थ” या पाण्याचे तीर्थात तळाशी ३ ते ५ मिनिटे राहून देवीचा तांदळा वर काढून व तेथे विधिवत पूजा करून परत पायी वडाळा येथे आणण्यात आला. तद्नंतर श्री. उमेश भालेराव, श्रीरामपूर यांचे सहकार्याने वडाळा महादेव येथील श्री. दगडू हरी राऊत यांनी आश्रमास जागा दिली. सुरुवातीस या ठिकाणी देवीचे छोटे मंदिर बांधण्यात आले व मोठ्या मंदिराचा संकल्प करण्यात आला. यास्तव यांनी मौनव्रत धारण केले.

मौनव्रत आणि मंदिर संकल्प

               २२ जुलै १९८४ अर्थात गुरु पौर्णिमा या दिवसापासून मौन व्रत सुरू केले. मंदिराचे शिखरावर कळस चढविणेपर्यंत मौन व्रताचा संकल्प केला. मौन व्रतात अनेक ठिकाणी पायपीट कधी सायकलवर, कधी मोपेडवरून, बसने प्रवास करून मंदिरासाठी मदत गोळा केली. मौन व्रतांच्या कालावधीत फक्त देवाचे नामस्मरण किंवा आरती अथवा प्रवचन असेल तेव्हाच महाराज मौन व्रत सोडीत इतर वेळी स्वत:बरोबर असलेल्या पाटीवर पेन्सिलने लिहून माहिती देत मौन व्रत इतके कडक होते की, महाराजांच्या मातोश्रीचे निधन झाल्यावर जे विधी करण्यात आले त्यावेळी महाराज बोलले नाही. २७ मे १९९७ रोजी सहस्त्रचंडी याग व विश्वशांती यज्ञ सोहळा पूर्णाहुती होवून रेणूका मातेची तसेच पावन सिध्दीविनायक, सप्तयोगीनी जलदेवता व योगीराज संत गजानन महाराज यांचे मुर्तीची नविन भव्य मंदिरात नविन भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली व महाराजांच्या मौन व्रताची सांगता झाली.

आध्यामिक व सांस्कृतीक उपक्रम

               १९९७ नंतर भव्य अशा सभामंडपाचे काम सुरु झाले व आज हे काम पुर्णत्वास आले असून भव्य सभा मंडप तयार झाल्याने अनेक धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन होत असून भाविकांची सोय झाली आहे आश्रमाच्यावतीने गेल्या २५ वर्षापासून नाथषष्टी निमित्त श्री क्षेञ पैठणकडे जाणाऱ्या व येणाऱ्या दिंडीची भोजनाची व निवासाची व्यवस्था केली जाते,तसेच दर गेल्या ५ श्रीरामपूर ते श्रीक्षेत्र माहूर पायी दिंडी सोहळा आयोजित केला जातो. तसेच दर ३ वर्षांनी येणा-या अधिक मास (पुरूषोत्तम मास) निमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह अथवा श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन केले जाते. सन २००५ पासून कुलस्वामिनी संस्कारमाला हा अभिनव संस्कारक्षम उपक्रम सुरू केलेला आहे. आश्रमात संगीत व संस्कृत भाषा परिक्षा केंद्र असून विद्यार्थ्यांना संगीताचे व  संस्कृत भाषेचे मार्गदर्शन केले जाते.शिर्डी येथे जाणा-या ५ पालखी सोहळयाचे स्वागत आश्रमातर्फे करण्यात येते.

संत महंतांच्या भेटी

              या आश्रमाला आतापर्यंत अनेक संत महंतांनी भेट दिली आहे यामध्ये प्रामुख्याने करवीर पीठाचे शंकराचार्य विद्याशंकर  भारती ,श्री क्षेञ सराला बेटाचे महंत प.पू.गुरुवर्य नारायणगिरी महाराज,देवगड संस्थानचे ह.भ.प.भास्करगिरी महाराज,श्री क्षेञ भगवानगडाचे महंत भिमसेन महाराज,सिध्देश्वर संत गुलाबबाबा(काटेल विदर्भ),गुरुदेव डॉ.काटेस्वामीजी महाराज,ॐ गुरुदेव जंगलीदास माऊली,प्रज्ञाच्चक्षु मुकूंदकाका जाटदेवळेकर,प.पू.अँड.विष्णु महाराज पारनेरकर,डॉ.राणमकृष्ण लहवीतकर महाराज,ह.भ.प.रामराव ढोक महाराज,प.पू.रमेशगिरी महाराज,प.पू.सुनिलगिरी महाराज आदिंचा समावेश आहे

विविध उत्सव व मान्यवरांची सेवा

               दरवर्षी शाकंभरी तसेच शारदीय नवराञ उत्सव तसेच गुरुपौणिमा व पौष पौर्णिमा उत्सव मोठ्या स्वरुपात,उत्साहात संपन्न होतो. तसेच श्रीराम जन्म,कृष्ण जन्म,दत्त जन्म गुरुचरिञ पारायण सोहळा आदि उत्सवाचे आयोजन होते.महाराष्ट्रातील नामवंत कलाकार,गायक तसेच किर्तन व प्रवचनकार यांनी रेणुका आश्रमात सेवा सादर केली आहे.