413709

श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान

ऊँ चैतन्य अडबंगनाथा : नम :
देवस्थानाचे नाव :- ऊँ चैतन्य अडबंगनाथ संस्थानठिकाण :- श्री क्षेत्र भामानगर (भामाठाण)

अडबंगनाथ मंदिर :‌
श्रीरामपुर तालुक्यातील भामानगर (भामाठाण ) हे एक छोटॆशे गाव. हे गाव गोदावरी काठी वसलेले आहे. तपोभुमी पवित्र गोदावरीच्या परिसरात ज्या ठिकाणी माणिक शेतक-याने गॊरक्षनाथांना स्वत:च्या मनाचे दान केले व बारा वर्षे खडतर तप केले. श्री क्षॆत्र सराला बेट येथील महान संत परमपुज्य नारायणगिरीजी महाराजांनी या पुरातण तपोभुमीचा अभ्यास करुन एक महान अडबंगनाथांची तपोभुमी श्रीराम प्रभुच्यां अश्रंनी तपशिला जी दुर्लक्षीत होती ती सर्वसामान्याना माहिती व्हावी म्हणुन त्यांचे परमशिष्य महंत रामाणाचार्य श्री अरुणगिरी नाथजी महाराजांकडॆ हे कार्य सोपविले. गावापासुन दुर एकांतात असलेल्या या तपोभुमीत अरुणजी महाराजांनी या तपशिळे जवळ ध्यानधारणा करुन मनोभावे सेवा केली. त्यांच्या कठोर सेवेतुनच आज या ऒसाड जागेत चैतन्य बहरते आहे. सन २००३ ला विजयादशमीच्या मुहुर्तावर सदगुरु नारायणगिरीजी महाराजांच्या शुभहस्ते पुजा करुन या तपोभुमीच्या जिर्णोधाराचे कार्य सूरु झाले व बघता बघता भाविकांच्या सहकार्यातुन या माळरानावर भव्यदिव्य मंदिर साकारु लागले. आजही काम चालु आहे.