413709

सोयाबीन काढणी व साठवणूक

सोयाबीन काढणी व साठवणूक

सोयाबीन पिकाची कापणी, मळणी व बाजारात विक्री करण्यापूर्वी मालाची साठवणूक करताना काळजी घेणे आवश्यक आहे. कारण या गोष्टी बियाण्याची गुणवत्ता व उगवणशक्ती टिकवून ठेवण्यात आणि योग्य बाजारभाव मिळवून देण्यात महत्वपूर्ण ठरतात. उत्तम दर्जाचे बियाणे उत्पादित करण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने सोयाबीनची कापणी, मळणी व साठवणूक करणे आवश्यक आहे.

काढणी (कापणी)

सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणे भरून ते पक्क झाल्यापासून पिकाची कापणी करेपर्यंतची हवामानाची स्थिती ही उत्पादित होणा-या बियाण्याच्या उगवणशक्ती व गुणवत्तेच्या दृष्टीने फार महत्चाची असते. पिकाच्या या अवस्थेत शेंगा पक्र होत असताना बियांतील आर्द्रता झपाट्याने कमी होत असते. या काळात सतत व दीर्घकाळ पडणारा पाऊस अत्यंत नुकसानकारक असतो. अशा पावसात पीक भिजून पुन्ह्या वाळते; त्यामुळे बियाण्याच्या उगवणीवर विपरीत परिणाम होती. जर पक्र अवस्थत पीक असताना पाऊस आला, तर पाऊस थांबल्यानंतर लगेच पिकाची कापणी करावी. मात्र, अशा वेळी कापलेले पीक वाळविण्यासाठी योग्य सुविधा असणे आवश्यक आहे. यामुळे बियाण्याची प्रत चांगली राहण्यास मदत होते; शिवाय शेंगा फुटून उत्पादनात घटदेखील येत नाही.

पीक तयार होण्याच्या १० दिवस  अगोदर हेक्टरी ४ किलोग्रॅम डायथेन-एम-४५ या बुरशीनाशकांची ८०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास बियाण्यावरील बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण होऊन उगवणशक्ती सुधारते. पिकाची कापणी धारदार विळ्याच्या सहाय्याने जमिनीलगत करावी. कापणी केलेल्या पिकाचे लगेच ढीग लावू नयेत व कापलेले पीक शेतातच उन्हात वाळू द्यावे. ढीग लावल्यास बियाण्याच्या प्रतीवर व उगवणशक्तीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. मोठ्या क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केलेली असल्यास वेळ व पेंशाची बचत होण्याच्या दृष्टीने कापणी व मळणी ही यंत्राद्वारे (कम्बायन हार्वेस्टर) करणे योग्य ठरते. कापणी करताना पाते जमिनीच्या वर ८ ते १० सें.मी. राहतील व यंत्राचा वेग मध्यम राहील, याची काळजी घ्यावी. ब्रश कटरचा वापर करूनदेखील सोयाबीनची कापणी करता येतें व कापणी केलेले सोयाबीन एक किंवा दोन मजुरांद्वारे गोळा केले जाते. या कापणी पद्धतीमुळे वेळ व मजूर यांची बचत होते.

मळणी

सोयाबीनची मळणी तीन पद्धतींचा वापर करून करता येते

  1. काठी किंवा मोगरीने बडवून
  2. ट्रॅकटरच्या चाकाखाली
  3. मळणी यंत्राद्वारे.

लागवडीचे क्षेत्र मोठे असेल, तर पहिल्या पद्धतीमध्ये जास्त वेळ व श्रम लागत असल्यामुळे ती योग्य ठरत नाही; तथापि ती पद्धत अल्पभूधारक शेतक-यांमध्ये लोकप्रिय आहे. या पद्धतीने मळणी केलेले २५-३० किलो बियाणे छोट्या शेतक-यांना पुढील हंगामामध्ये एक एकर क्षेत्रावर पेरणी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. ट्रॅक्टरच्या चाकाखाली मळणी केल्यास बियाण्याच्या पापुद्रयास इजा पोचून बियाण्याचे नुकसान होत नाही व त्याची उगवणशक्तीही चांगली राहते. परंतु, अशी मळणी सिमेंटच्या कडक आणि टणक खळथावर किंवा सारवलेल्या खळ्थावर करू नये. त्यासाठी शैतात ताडपत्री अंथरुन किंवा मातीच्या खळ्थावर कापणी केलेल्या पिकाचा २.५ ते ३.५ फूट जाड थर पसरवून एक ते दीड तास उन्ह्यात वाळवाचे व थरांची आलटापालट करून शेंगामधून बिया बाहेर पडण्यासाठी त्यावर दोन ते तीन वेळा ट्रॅक्टर फिरवावा. यामुळे बियाणे फूटून त्याची डाळ होण्याची शक्यता कमी होते व हे बियाणे पुढील हंगामात मोठ्या क्षेत्रावर पेरणी करण्यासाठी उपलब्ध होते. मळणी यंत्राने मळणी करायची असल्यास विथाण्यातील आर्द्रता १४ टक्क्यांपेक्षा कमी नसावी, तसेच मळणी यंत्राचे फेरे (आरपीएम) मिनिटाला ३५० ते ४०० पर्यंत मर्यादित ठेवावेत. मळणी यंत्र चालू असताना अधूनमधून पोत्यामध्ये पडणा-या बियाण्याकडे लक्ष ठेवून विष्यांची डाळ होण्याचे प्रमाण जास्त होत असल्याचे निदर्शनास आल्यास आरपीएम कमी करावेत.

हाताळणी व साठवणूक

ताडपत्रीवर एकसारखे पसरवून बियाण्यातील आर्द्रता १०-१२ टक्के काड्या, कचरा, माती, खडे इत्यादी काढून ते स्वच्छ करावे. समान आकाराचे बियाणे मिळण्यासाठी ४ मि.मी. लंबवर्तुळाकार आकाराचे छिद्र असलेल्या चाळण्यांचा वापर करावा. बियाणे हाताळताना ते जास्त उंचीवरून आपटले जाणार नाही, याची काळजी घ्यावी. स्वच्छ केलेले बियाणे कोरड़या जागेत स्वच्छ, कोडविरहित किंवा नवीन पोत्यात साठवून ठेवावे. साठवण करायच्या बियाण्याची आद्रता ८-१० टक्के असावी. बियाण्यातील आर्द्रता ६ टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास उगवणशक्तीवर परिणाम होतो. बियाणे भरून ठेवण्यासाठी ज्यूटचे पोते वापरावे.

सोयाबीनचे बियाणे हवेतील आर्द्रता लवकर शोषून घेते, त्यामुळे साठवणुकीची जागा कोरडी व ओलावा प्रतिबंधक असावी व उन्हाळ्यात बियाणे साठवण केलेल्या खोलीतील तापमान ४२ अंश से पेक्षा जास्त असू नये. बियाणे १oo केिलींच्या पोत्यामध्ये भरलेले असल्यास साठवणूक करताना ४ पोत्यांमध्ये जास्त व ४० किलोंच्या पोत्यामध्ये भरलेले असल्यास ८ पोत्यांपेक्षा जास्त थप्पी लावू नये. अन्यथा, सर्वात खालच्या पोत्यातील बियाण्यावर जास्त वजन पडून बियाणे फुटून त्याची उगवणशक्ती कमी होते. पोत्यांची थप्पी जमिनीपासून १०-१५ सें.मी. उंचीवर लाकडी फळ्यांवर लावावी.

पोत्यांची रचना उभीआडव्या पद्धतीने करावी, म्हणजे हवा खेळती राहून बियाण्याची गुणक्ता व उगवणशक्ती जास्त काळ टिकण्यास मदत होते. आवश्यकतेनुसार बियाणे साठवण केलेल्या खोलीमध्ये कीटकनाशक व बुरशीनाशकाचा वापर करावा. बियाणे साठवण केलेल्या खोलीमध्ये उंदरांचा उपद्रव होऊ नये, यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. सोयाबीनच्या बियाण्याच्या पोत्यांची हाताळणी व वाहतूक काळजीपूर्वक करावी. पोती उंचावरून आदळली जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

92 total views, 0 views today