413709

श्रीरामपूर नगरपालिका शाळा क्रमांक ७

श्रीरामपूर नगरपालिका शाळा क्रमांक ७

श्रीरामपूर नगरपालिका शाळांपैकी सर्वात प्रथम ISO मानांकन मिळालेली शाळा.

 

                    नगरपालिका शाळा  क्र. ७, श्रीरामपुर या शाळेची स्थापना ३१/१२/१९८५ रोजी झाली. सुरुवातीला शाळा जवाहर कारखान्यामागे बारवकरांच्या जागेत होती. भाडे तत्वावर त्यानंतर १९९० ला विकास स्टील रोडला कोटक यांच्या जागेत भाडेतत्वावर आली. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत दोन वेळा इमारती बांधण्यासाठी निधी आले. परंतु जागा उपलब्ध नसल्यामुळे दुसऱ्या शाळेला तो निधी वर्ग झाला. २००९-२०१० मध्ये निधी मिळाला. बाळासाहेब रामभाऊ मोरगे यांच्याकडून जागा बक्षिसपात्र मिळाली. त्यानंतर सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळा बांधकाम प्रस्ताव तयार करुन निधी मिळवला. व आज शाळा सन २०१२ पासुन स्वत:च्या मालकीच्या इमारतीत सुरु आहे.२५ लाख खर्चून इमारत तयार झाली. शाळेच्या इमारतीचा परिसर सुंदर व आकर्षक आहे. चाइल्ड फिल्ड योजनेचे २.२५ लाख आले व त्यातून खेळणी बसवली. लोक सहभागातून साऊंड सिस्टीम मिळाला. त्यानंतर सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळा बांधकाम प्रस्ताव तयार करुन निधी मिळवला. व आज शाळा २५ ऑगस्ट २०१२ पासुन स्वत:च्या मालकीच्या इमारतीत सुरु आहे.

                   शाळा स्वच्छ व सुंदर असल्यामुळे अधिकारी वर्गाच्या भेटी असतात. शालेय पोषण आहार योजनेच्या पाहणीसाठी केंद्रीय कमेटी, संत गाडगेबाबा स्वच्छता मोहिम पाहणीसाठी जिल्हा कमेटी, नगर पलिका शाळेचे काम पाहण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचे प्रशिक्षणार्थी शाळेत आले. प्रभावित होऊन ते कौतुक करतात. अशा या शाळेचा ३१ ङिसेबरला ३१ वा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला.

                     शाळेत ज्ञानरचनावाद पदधतीने अध्यापन केले जाते. त्याचबरोबर डिजिटल पदधतीनेही अध्यापन केले जाते. शाळा भौतिक सुविधांनी अतिशय सुसज्ज असून नुकतेच एप्रिल २०१६ मध्ये शाळेला आय.एस.ओ. मानांकन प्राप्त झाले आहे. 

                    शाळेत शासनाच्या सर्व योजना राबवल्या जातात.शासकिय योजनांबरोबर शाळेत धार्मिक सण- उत्सव, जयंत्या व पुण्यातिथी, नवागतांचे स्वागत,शैक्षणिक सहल, भोंडला, दिंडि, शाळा स्वच्छता अभियान, दिव्याची अमावस्या, नागपंचमी, रक्षा-बंधन, दही-हंडी, शैक्षणिक सहल, पालकमेळावा, आनंद बाजार, इत्यादि उपक्रम शाळेत उत्साहाने राबविले जातात. शाळेचा नोंदणी पट नेहमीच १००% असतो. शाळेचा एकूण पट ९८ असून ४ शिक्षक शाळेत कार्यरत आहेत.नगरपरिषद व नगरपालिका शिक्षण मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने दरवर्षी नगरपालिकेचा सर्व शाळा व खाजगी प्राथमिक शाळांचा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव साजरा केला जातो. यात दरवर्षी न. पा. शाळा क्र.७ सहभाग घेते. 

१) मोफत गणवेश योजना - शासानामार्फत शाळेतील सर्व मुली व अनु. जाती व जमातीच्या मुलांना मोफत गणवेश दिले जातात. व बाकीच्या सर्व विदयार्थ्याना गणवेशासाठी समाज सहभाग घेऊन दिले जातात.

२) पोषण-आहार योजना - पोषण-आहार योजने अंतर्गत शाळेतील सर्व विदयार्थ्याना दररोज पोषक आहार दिला जातो. त्यात आठवड्याच्या मेनूत मटकी-उसळ-भात, मुगदाळ-खिचडी, वाटाणा-उसळभात अशा प्रकारे आहार पुरविला जातो.

३) मोफत पाठयपुस्तके - राज्य शासनामार्फत शाळेतील सर्व विदयार्थ्याना दरवर्षी मोफत पाठयपुस्तके दिली जातात.

४) अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती –शाळेतील अल्प सख्यांक विद्यार्थ्यांचे फॉर्म दरवर्षी भरले जातात. या संवर्गातील विद्यार्थ्यांना शासना मार्फत शिष्यवृत्ती दिली जाते. 

५) अदिवासी शिष्यवृत्ती –अनु. जमातीतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. सदर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म भरून घेतले जातात. तसेच दरवर्षी आरोग्य विभागामार्फत शाळेतील सर्व मुलांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते. कर्णबधीर, मूकबधीर विद्यार्थ्यांना मोफत आरोग्य सेवा पुरविली जाते.

                  बाल आनंद बाजार उपक्रम शाळेत राबविला जातो. समाज सहभागाने व शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाने तसेच नगर पालिका शिक्षण मंडळाच्या सहकार्याने शाळेची वाटचाल प्रगतीपथावर असून सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून शाळेत इयत्ता ५ वी चा वर्ग सूरू करण्याचा मानस आहे. समाज सहभागातून शाळेने आतापर्यत पाच लक्ष रूपये निधी मिळाविलेला आहे. व त्यातून भौतिक सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे.  

मुख्याध्यापिका - श्रीम. कु-हे अलका रमेश.

उपाध्यापिका -  सौ. जयकर प्रतिभा धैर्यधर

सौ. कर्डिले रजनी अशोक

श्री. गायकवाड राज उत्तम.

4 Responses

 1. admin says:

  very good school

 2. admin says:

  very good school in shrirampur

 3. Aamrapali Jadhav says:

  खुप चांगली शाळा आहे

 4. Jadhav family says:

  It is very nice school

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *