शाहिद दिनाच्या निमित्ताने क्रांतिवीर भगतसिंग ब्रिगेडच्या वतीने श्रीरामपूर शहरात भव्य मोटार सायकल रॅली संपन्न (23/3/2017)

श्रीरामपूर – क्रांतिवीर भगतसिंग ,सुखदेव,राजगुरू यांच्या शहीद दिनाचे औच्यत्य साधून युवक-विदयार्थी कष्टकरी,शेतकरी-शेतमजूराच्या अन्न-वस्त्र -शिक्षण-आरोग्य -निवारा यासह विविध मूलभूत प्रश्नांना घेऊन क्रांतिवीर भगतसिंग ब्रिगेडच्या वतीने भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली.सदर रॅलीची सुरवात ही लाल निशाण पक्ष(ले) च्या कार्यालयापासून सुरवात होऊन संगमनेर रोड,शिवाजी रोड- मेनरोड-काळाराम मंदीर रोड-नेवासा रोड मार्गे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सभेत रूपांतर झाले.सदर रॅलीत मोठ्या संख्येने युवक-विद्यार्थी, कष्टकरी सहभागी झालेले होते.
यावेळी लाल निशाण पक्षाचे जिल्हा अध्यक्ष कॉ.बाळासाहेब सुरुडे हे उपस्तीत होते. यावेळी कॉ.राजेंद्र बावके, कॉ.जीवन सुरुडे,कॉ.मदिना शेख,कॉ.गोरक्ष कडवे,कॉ.लक्ष्मण डांगे यांची भाषणे झाली.
सदर रॅली यशस्वी करण्यासाठी सर्वस्वी कॉ.राजेंद्र बावके,कॉ.बाळासाहेब सुरुडे,कॉ.मदिना शेख,कॉ.जीवन सुरुडे,कॉ.अरुण बर्डे,कॉ.श्रीकृष्ण बडाख,कॉ.गोरक्ष कडवे,कॉ.लक्षमण डांगे,सुयोग ससकर,अनिल बोरसे, आसरु बर्डे,उत्तम माळी,प्रकाश भांड,रवी गायकवाड,भीमा साळूके,संदीप पटारे, प्रवीण निकम,शुभम वाघ,पंकज रधे,बाळासाहेब वाणी,संदीप शिंदे,सचिन शेळके,अजय बत्तीसे, दीपक व्यवहारे,मोसिंन शेख,अजय टाके,नितीन बनकर आदी प्रयत्न केले.

1,498 total views, 0 views today